shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अलिबाग मुरुड समाजवादी पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा सारिका शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश

 प्रतिनिधी :  राजेश बाष्टे

अलिबाग :  अलिबाग मुरुड विधासभा समाजवादी पक्षाच्या महिला अध्यक्षा सारिका शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांच्या सह आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.सारिका शिंदे ह्या गेली १० वर्ष अलिबाग मुरुड विधानसभा समाजवादी पक्षाच्या महिला अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या.सारिका शिंदे ह्या मुरुड तालुक्यातील वडघर उसरोली गावच्या आहेत त्यांचा जन्म एका गरिब घरात झाला असून त्यांना कुठलाही राजकिय वारसा नसतांना सुधा त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून विभगतील  अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सुरु असलेली वाटचाल आणि राज्यातील महायुतीचे सरकार करत असलेल्या कामामुळे तसेच अलिबाग मुरुड तालुक्यात आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित झाल्यामुळे आपण पक्षप्रवेश करत आहोत.पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्याची आपली तयारी असल्याचे सारिका शिंदे यांनी सांगितले.

पक्ष प्रवेशा याप्रसंगी आमदार मंहेद्र दळवी , शिवसेना जिल्हा अध्यक्ष राजा केणी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश चव्हान,अशरफ  घट्टे,भाजपचे नेते महेश मोहिते,भाजप अलिबाग शहर अध्यक्ष अ अंकित बंगेरा, भाजपचे अशोक वारगे सह शिवसेना व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
close