shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आ.नमिताताई मुंदडा यांचे केज मतदार संघात ' पॅचअप ' सुरु गैरसमजातून दूर गेलेले कार्यकर्ते पुन्हा मुंदडा यांच्या तंबुत!!


       -------------------------------------------   
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
 केज विधानसभा मतदार संघ हा जवळपास 85 किलोमीटर पर्यंत विस्तारलेला आहे. या मतदारसंघात जिल्ह्यात सर्वात जास्त मतदार आहेत. मतदार संघाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याने इच्छा असूनही काहीवेळा पोहचता येत नाही किंवा अडचणीमुळे जाता येत नाही. नेमकी हीच खुणगाठ कार्यकर्ते व नेतेमंडळी बांधत असतात . आणि ती 'सल' निवडणुका येईपर्यंत मनात ठेवून निवडणुकीच्या वेळी आपला अधिकाररुपी हक्क रागाच्या व संतापाच्या माध्यमातून व्यक्त करतात. केज विधानसभा मतदार संघात हे प्रमाण अधिक आहे. आ.नमिताताई मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा हे सतत जनसंपर्कात असतात. विकासाच्या माध्यमातून परिसरात सातत्याने काम करण्याच्या प्रयत्नात असतात मात्र दरम्यानच्या काळात काही व्यक्ती किंवा काही माणसे हे आपसुकपणे दुर्लक्षित होतात आणि त्या गैरसमजातून विनाकारण सामान्य माणसाच्या मनात गुंता निर्माण होतो .आणि त्यातून तो सोशल मिडिया किंवा वेगळ्या माध्यमातून पुढे येतो. अशाच काही गैरसमजातून दुर गेलेल्या आणि जे मूळ विचारधारेचे आहेत अशा मंडळींना एकत्र करुन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न म्हणजेच एक 'वेल पॅच ' निर्माण करण्याचा प्रयत्न युवा नेते अक्षय मुंदडा करत आहेत.


           केज विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात आजपर्यंत 2000 कोटीची विकासकामे कधी झाली नाहीत ती कामे केवळ गेल्या अडीच वर्षात करण्याची धमक आ.नमिताताई मुंदडा यांनी दाखविली .त्यांच्या पाठिशी माजी मंत्री लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे, माजी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे मार्गदर्शन तर जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांची समर्थ साथ आणि पाठबळ होते. विकासाची कामे होत गेली .दरम्यानच्या काळात नवी माणसे जोडली गेली तर नव्याच्या नादात काही जुनी माणसे दूर गेली. दूर गेलेली माणसे ही गैरसमजातून दूर गेली ती दूर जाण्यामागे किंवा ती दूर जावीत असे कधीही मुंदडा कुटूंबियाना वाटले नाही परंतु एखाद्याचा गैरसमज छोट्या छोट्या प्रसंगातून व घटनातून होत असतो असे बरेचजण गेल्या अडीच वर्षाच्या काळात दुखावले गेले आणि बाजूला झाले. निवडणुकीचा हंगाम सुरु झाल्याने दुखावलेले, बाजूला झालेले आणि नाराज झालेले यांनी समाज माध्यमातून आपली सल व्यक्त केली तशी ती रास्त होती परंतु त्या मागे मुंदडा कुटूंबियांचा द्वेष किंवा त्याच्या आडून काही वेगळे करण्याची भुमिका मुंदडा कुटूंबियांची किंवा त्या कार्यकर्ता वर्गाची नव्हती. राजकारण्यांचे घर हे कोणासाठीही 24 तास खुले असते. कारण त्या घरावर कार्यकर्त्यांचा व मतदारांचा प्रथम हक्क असतो. मग त्या दरम्यान काही मंडळी त्या ठिकाणी गेली असेल मुंदडा कुटूंबियाकडून दुर्लक्ष झाले असेल किंवा अनावधानाने काही बोलले असतील हे नाकारता येणार नाही परंतु त्यामागची भुमिका आणि त्यादरम्यानची परिस्थिती सुद्धा तपासणे महत्वाचे आहे. मुंदडांनी कोणाचा द्वेष केला असे दिसत नाही. तरीसुद्धा जी नाराज झालेली मंडळी आहे किंवा जे सातत्याने फेसबुकवर मुंदडा कुटूंबियाविषयी नाराजी व्यक्त करतात अशाना एकत्रीत करुन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न युवा नेते अक्षय मुंदडा यांनी चालविला आहे त्यांच्या या वेलपॅचला सर्व नाराज सहाकार्‍यांनी गिले शिकवे, राग लोभ विसरुन पुन्हा प्रचार कार्यात सहभागी होण्याची भुमिका जाहिर केली आहे. अक्षय मुंदडा यांचे वेलपॅच हे आमदार नमिताताई मुंदडा यांच्या विजयासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
close