shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांना संघर्ष समितीने घातले साकडे


*जिल्हा विभाजन ऐवजी नामांतर केल्याने हेमंत ओगलेंना जाहिर पाठिंबा- राजेंद्र लांडगे

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा नगर जिल्हा आहे. शासन दरबारी गेली ४२-४३   वर्षापासून जिल्हा विभाजनाचं घोंगडं भिजत पडलं आहे. मध्यंतरी शासनाने जिल्हा विभाजन ज्वलंत प्रश्नाला महत्व न देता नामांतर केलं. या पार्श्वभूमीवर दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेऊनच श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवेदन देऊन श्रीरामपूर जिल्ह्याबाबत साकडे घालत श्रीरामपुर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले यांना जाहिर पाठिंबा दिला आहे.

याप्रसंगी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती उपाध्यक्ष लकी सेठी, अशोकराव बागुल,  शिवाजीराव शेजुळ, तिलक डुंगरवाल,सुरेश कोकरे, विजय नगरकर, अनिस पठाण, इसाक पटेल, हनुमंत खरात आदि मान्यवर उपस्थित होते.

श्रीरामपूर विधानसभा उमेदवार हेमंत ओगले यांचे प्रचार सभेत मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी महसूल मंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे या सर्वांचा राजेंद्र लांडगे यांनी सन्मान करत मागणी चे निवेदन दिले.
          याप्रसंगी खा. सुप्रियाताई सुळे यांचा सन्मान करतांना राजेंद्र लांडगे यांनी सर्वेसर्वा श्री. शरदचंद्र पवार यांचे येत्या वाढदिवशी श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी उच्च स्तरावर प्रयत्न व्हावे तसेच शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवशी श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी उच्च स्तरावर प्रयत्न करावे असे सदरील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
         निवेदनाचा स्वीकार करून खा. सुप्रियाताई सुळे यांनी तत्परतेने तुम्हाला श्रीरामपूर जिल्हा हवा आहे. या मागणीला मी हो म्हणणार नाही, मला माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांची परवानगी घ्यावी लागेल असे जाहीर सभेत आश्वासित केले. 
यामुळे आज ना उद्या नक्कीच श्रीरामपूर जिल्हा होणार असल्याने सर्व जिल्हा प्रेमींच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत असे राजेंद्र लांडगे यांनी शेवटी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
वृत्त विशेष सहयोग* 
 पत्रकार अजीजभाई शेख - राहाता 
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close