प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी.
केज मतदारसंघात जसजसी निवडणूक मतदानची तारीख जवळ येत आहे. तसतसी भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. लोकांशी संपर्क, संवाद व विकास कामांसाठी आणलेल्या भरघोस निधी मुळे, झालेल्या विविध विकास कामामुळे तसेच महिलांसाठी राबवलेल्या लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे व वयोवृद्धांसाठी तिर्थक्षेत्र योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भाजप माहायुतीच्या उमेदवार सौ.नमिता मुंदडा या जनतेच्या मनात राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत.
तसेच त्यांचा सौज्वळ स्वभाव व जनतेचे म्हणणें ऐकून घेऊन त्यावर तात्काळ तोडगा काढून सांगितलेले काम मार्गी लावण्याच्या वर्ती मुळे नमिता मुंदडा यांनी इतर उमेदवारांना केज मतदारसंघातून खुप मागे टाकले आहे. समाजसेवक तसेच भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप महायुतीचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत. लोकनेत्या पंकजा मुंडे, माजी खासदार प्रितमताई मुंडे यांची भक्कम साथ या मुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवार नमिता मुंदडा यांचीच केज मतदारसंघात हवा निर्माण झाली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे अशी मतदारसंघातून सगळिकडे चर्चा ऐकायला मिळत आहे.