shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुस्लिमांना नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्याबाबत सकारात्मक - इद्रिस नायकवाडी


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू, फुले,आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. म्हणूननच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळात मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुस्लिमांना नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे हे सुध्दा घर्मनिरपेक्ष व पुरोगामी विचारांवर काम करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे अशा धर्मनिरपेक्ष विचाराच्या नेतृत्वाखालील श्रीरामपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. कानडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठवावे, असे आवाहन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नायकवाडी यांनी केले.


श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ शहरातील वार्ड नंबर २ मधील मौलाना आझाद चौक येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. माजी नगरसेवक मुख्तार शहा अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सचिव हसीन शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, कुरेशी समाजाचे अध्यक्ष मेहबूब कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे आदीसह मान्यवर उपस्थित होते.

नायकवाडी म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या समाजाच्या विकासासाठी आपल्या विचाराची माणसे सत्तेत जाणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुस्लिम समाजाला सत्तेत प्रतिनिधीत्व दिले. अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टी) ची स्थापना करून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास बाराशे कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने काम करणारे नेतृत्व ओळखावे असे आवाहन त्यांनी केले.

आ. कानडे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी मायबाप मतदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी दिली. ती जबाबदारी समजून आपण भेदभाव न करता प्रामाणिकपणे काम केले. जे जे प्रश्न लोकांनी आणले ते सोडवण्याचा प्रयत्न केला वार्ड नंबर २ मध्ये सात कोटीहून अधिक रुपयांची विकास कामे केली. मतदारसंघात १२०० कोटी रुपयांचा विकास निधी आणला पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा आमदार पळून गेला. काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. त्या संकट काळात आपल्याला उमेदवारी दिली. आपण एकनिष्ठ व प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले. परंतु मला धोका मिळाला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नाही म्हणून षडयंत्र रचले गेले. पक्षाच्या नेतृत्व या कट कारस्थानला बळी पडले. ठराविक घराण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले उमेदवारी नाकारली. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या पाठीशी उभे राहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली. कटकारस्थान रचनाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अविनाश आदिक यांनी, आ. कानडे यांनी या भागात सात कोटी पेक्षा अधिक रुपयांची विकास कामे केली आहेत. कोट्यावधी रुपयांची विकास कामे करूनही काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. परंतु आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महायुतीचे उमेदवार असून त्यांना मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केले. या भागात केलेल्या विकास कामांमुळे सर्व मुस्लिम समाज तुमच्याबरोबर असून या भागातून मोठे मताधिक्य देऊ, अशी ग्वाही माजी नगरसेवक मुक्तार शहा यांनी यावेळी दिली. यावेळी याकूब शहा, आदिल मखदूबी यांची भाषणे झाली. भटक्या विमुक्त समाजाचे नेते मल्लू शिंदे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले.

यावेळी माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, सलीम शेख, मोहम्मद शेख, भाऊसाहेब मुळे, राजेंद्र पवार, अल्तमश पटेल, अशोक कानडे, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, जयश्री शेळके, सायरा शहा, कविता कानडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव फारूक पटेल, राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, युवक जिल्हा कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अल्तमश पटेल, माजी नगरसेवक नजीर मुलानी, तालुका युवक उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, गुरुचरण सिंग भाटियानी महिला तालुकाध्यक्ष मंदाताई गवारे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण, तसेच प्रा. कार्लस साठे, राजेंद्र कोकणे, बंडोपंत बोडखे, जयकर मगर. अक्षय नाईक, फिरोज शहा, एजाज दारूवाला, अहमद शहा, मुदस्सर शेख, जावेद तांबोळी, अब्दुल मणियार, बागवान, नदीम तांबोळी, अब्दुल मणियार, दिशान शेख, फिरोज पठाण, इफ्तेकार शेख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व मुस्लिम समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close