आज कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीचा निकाल लागला.. निकाल काय लागणार हे मला मी उभा राहिलो त्याच दिवशी मला ज्ञात होते.. म्हणून मी मतदान केंद्रावर फिरलो नाही अथवा मोजणी ला देखील हजर राहिलो नाही..
*मी बाजारपेठेत कायम ऐकत आलो.. कोपरगाव मध्ये तिसरा पर्याय नाही.. आम्ही तिसऱ्या पर्याया सोबत राहू.. असो मतदानातून काय सिध्द करायचे आणि व्हायचे ते सिध्द झाले.
निवडणूक दरम्यान मी मा आण्णा हजारे यांची एक मुलाखत पाठवली होती.. ज्या मध्ये ते म्हणाले होते कि मी निवडणूक लढवली तर माझे डिपॉझिट जप्त होईल.. ते, सत्य झाले मी पुन्हा अनुभवले.. श्रीमती मेघा पाटकर यांना देखील मतदारांनी नाकारले होते.. हे देखील मला ज्ञात होते... कोपरगाव च्या उध्वस्त बाजारपेठेला नेते नव्हे तर विकले गेलेले मतदारच जबाबदार हे निश्चित..
*माझा झालेला पराभव मी स्विकारला.. किंबहुना ह्या पराभवा संदर्भात अथवा निवडणूक संदर्भात कुणासोबत देखील चर्चा देखील करणार नाही कारण हि निवडणूक मी एकट्याने व स्वखर्चाने लढवली.. मला चांगले वाईट सगळे अनुभव आलेत..*
इव्हीएम बद्दल मी काहिच बोलणार नाही.. कारण त्या बाबत मा संजय राऊत सत्य बोलत आहेत.. जे महाराष्ट्र भर घडलं त्यास कोपरगाव मतदार संघ देखील अपवाद नाही...
*होय मी निवडणूकी दरम्यान माझा स्वाभिमान जपला..*
*मी कोणत्याही मतदाराला हात जोडून मत मागितले नाही..*
*मी कोणाकडून रुपया मागितला नाही..*
*मी कोणाला च माझ्यासोबत प्रचाराला येऊ दिले नाही..*
*मी कोणी भाडोत्री गोळा केले नाही..*
*मी दारु पाजली नाही अथवा जनतेच्या व प्रशासनाच्या नाकावर टिच्चून पैसा वाटला नाही*
*मी खोटेपणा केला नाही*
*मी निवडून येणार नाही हे मला ज्ञात होते..*
आता निवडणूकीनंतर मी माझा एकटाच माझे काम करणार...
मतदारांनी सिध्द केले माझ्या सारखा प्रामाणिक माणूस त्यांचा नेता होऊच शकत नाही.. आणि मी झालो नाही.. मला स्वतः चा अभिमान आहे मी अशांचा प्रतिनिधी नाही ...
*माझे सामाजिक काम पवित्र आहे.. मी जी घाण साफ करतो, जी गटार साफ करतो तीच पवित्र आहे.. ज्या झाडांसोबत मी जगतो तेच प्रामाणिक आहेत..*
*मला प्रचिती आली एक महिना मी आंधळ्यांचे शहरात आरसा घेऊन फिरत होतो..*
*गांजाच्या शेतात तुळस लावण्याचा प्रयत्न करीत होतो..*
समाज प्रबोधन व जनसेवा हेच माझे व्रत.. ते देखील स्वतःचे हिमतीवर व कष्टावर अवलंबून..
*ते मी निभावत राहणार.. मी जगणार माझ्या व्रतात, मी जगलो, मी लढलो, मी पडलो माझ्याच शाण मध्ये..*
मी जे २७ दिवसात शिकलो त्यातून निवडणूक प्रक्रियेतील बदला साठी लढा उभा करणार.. स्वच्छ निवडणूकां साठी.. हाच माझा निर्धार ..
*जी निवडणूक मी लढलो तशी निवडणूक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्य घटनेला मान्य नाही अभिप्रेत नव्हती हे निश्चित.. हि चोर पावलांनी सरंजामशाहीच रूजली आहे.
संजय बबुताई भास्करराव काळे