प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. 3 / करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील बागल गटाच्या कट्टर कार्यकर्त्यांनी झोळ परिवारामध्ये प्रवेश केला. करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक रामदास झोळसर योग्य पर्याय असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना बहुमताने निवडून देण्यासाठी काम करणार असल्याचे मत पारेवाडी येथील बागल गटाचे कार्यकर्ते यांनी व्यक्त केले. पारेवाडी येथील बागल गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते निलेश गरुड, सुंदर गरुड, शिवाजी शिंदे, विष्णू जाधव, संभाजी गरुड, राहुल गरुड, तोफिक आतार यांनी करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी प्राध्यापक रामदास झोळसर यांना पाठिंबा देऊन झोळसर परिवारामध्ये प्रवेश केला.
यावेळी पारेवाडी येथील बागल गटाच्या कार्यक प्राध्यापक रामदास झोळसर यांना निवडून आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचे सांगितले आहे. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर रामदास झोळसर यांच्या धर्मपत्नी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा सौ. मायाताई झोळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सध्या करमाळा तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट असून सुशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू नेतृत्व म्हणून करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या नावाची चर्चा असून यंदा बदल घडणार आहे. प्राध्यापक रामदास झोळसर यांना जनता नक्कीच निवडून देईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. पारेवाडी ग्रामस्थांच्यावतीने करमाळा तालुक्यातील पारेवाडी गावातुन सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. यावेळी रामदास झोळ फाउंडेशनचे संजय जगताप ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते.