श्रीरामपूर / प्रतिनिधी :
श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला सोडचिठ्ठी देत माजी उपनगराध्यक्ष तथा दलित मित्र चरणदादा चव्हाण, नगरसेविका प्रणिती दिपक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष व खादी ग्रामोद्योगचे व्हा. चेअरमन दीपक चव्हाण आणि शहर उपाध्यक्ष प्रसाद चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
कामगार कॉलनी, रामदेवजी बाबा मंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.
यावेळी युवा नेते करण ससाणे यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
यावेळी ससाणे म्हणाले की स्व. जयंतराव ससाणे व चरणदादा चव्हाण यांची मैत्री सर्व श्रीरामपूरवासियांना माहित आहे. चव्हाण कुटुंबाने नेहमी कामगार हिताच्या प्रश्नांवर आवाज उठवलेला असून त्यांना या कार्यात स्व.ससाणे साहेबांनी देखील मोलाचे सहकार्य केलेले आहे. चव्हाण यांच्या प्रवेशाने पक्षाला नक्कीच फायदा होईल असेही ससाणे यांनी म्हटले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड म्हणाले की चरण दादा चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत फक्त आणि फक्त कामगारांचे प्रश्न आणि समस्या केंद्रस्थानी ठेवून कार्य केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून संपूर्ण चव्हाण कुटुंब सामाजिक कार्य करत असल्याचे म्हटले.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक श्रीनिवास बिहाणी म्हणाले की श्रीरामपूर नगर परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण चव्हाण कुटुंबीयांनी कामगारांचे प्रश्न मार्गी लावले. विशेष करून कामगारांना आपले स्वतःचे घर मिळावे यासाठी स्व.ससाणे साहेब आणि चरणदादा चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. यापुढील काळात एका दिलाने पक्षासाठी काम करू असे आश्वासित केले.
यानंतर माजी उपनगराध्यक्ष चरण चव्हाण म्हणाले की स्व.जयंतराव ससाणे व चव्हाण कुटुंबीयांचे स्नेहाचे संबंध होते. अनेक गोष्टींमध्ये स्व. ससाणे यांचे मार्गदर्शन आम्ही घेत असत. यापुढील काळात ससाणे यांच्या संघटनेसोबत काम करून महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार श्री हेमंत ओगले, जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, पंडित बोंबले, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, काॅग्रेंस पक्षाच्या प्रभारी रणपिसे ताई, माजी नगरसेवक दिलीप नागरे, रितेश रोटे, भरत कुंकलोळ, महंता यादव, शामलिंग शिंदे, मुन्नाभाई पठाण, नजीरभाई मुलानी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, प्रेमचंद कुंकूलोळ,अशोक थोरे,ॲड समिन बागवान, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा दिपालीताई ससाणे, दीपक वमने, आसिफ शेख, रफिक शेख, विनीत कुंकूलोळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर -9561174111