प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी केज मतदारसंघातील निवडणूक आता रंगात आली आहे. प्रमुख तिन उमेदवारांत ही निवडणूक होत असली तरी केलेल्या विकासकामांची पावती केज मतदारसंघातील सुध्न्य जनता भाजप महायुतीच्या उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनाच देणार असून नमिता मुंदडा या त्यांनी केलेल्या विकासकामामुळे केज विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून येतील असा आत्मविश्वास मुंदडा कुटुंबाचे कट्टर समर्थक व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सुर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे. भाजप महायुती, राष्ट्रवादी श.प. व मनसे या प्रमुख पक्षामध्ये केज मतदारसंघातील निवडणूक होत आहे.
परंतु कार्यकर्त्यांची मजबूत फळी व केज मतदारसंघात केलेल्या भरीव विकास कामामुळे नमिता मुंदडा यांनी प्रचारात इतर उमेदवारांपेक्षा मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे.
तसेच भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा युवा नेते अक्षय मुंदडा यांची खंबीर साथ व लोकनेत्या पंकजा मुंडे यांचे खंबीर नेतृत्व नमिता मुंदडा यांच्या सोबत असल्याने नमिता मुंदडा यांचा विजय सुकर झाला आहे असे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सुर्यवंशी यांनी मत व्यक्त केले आहे.
केज शहरातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सुर्यवंशी, अतुल इंगळे, प्रकाश मुंडे, खद्दीर भाई खुरेशी, सुहास चिद्रवार,संजय गुंड, धनंजय घोळवे, मुन्ना शिंदे,संजय कोरडे,मोबीन भाई शेख,हाकीमभाई, सचिन कराड, सचिन नेहरकर सह असंख्य कार्यकर्ते नमिता मुंदडा यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.