श्रीरामपूर / प्रतिनिधी:
दिनांक ११ व १२ नोव्हे. २०२४ रोजी इपीएस पेन्शनधारकांच्या राष्ट्रीय झूम मिटिंग बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे केंद्र सरकारकडून १० ते १२ वर्षापासून इपीएस पेन्शनधारकांचा पेन्शनवाढीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला नाही.लवकरच प्रश्न मार्गी लागेल अशी आश्वासने कामगार मंत्री, अर्थमंत्री यांचेकडून फक्त मिळत आहेत.महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्वी निर्णय होईल अशी अपेक्षा होती.अद्याप निर्णय न झाल्याने आता नवी दिल्ली येथे पेन्शनधारकांचे देशव्यापी आंदोलन दि.१० ते ११ डिसेंबर रोजी रामलीला मैदान येथे पेन्शनर बचाओ अभियान अंतर्गत न्याय हेतू संघर्ष कार्यक्रम राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी धरणे व आमरण उपोषण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी श्रीरामपूर येथे दिली.
दिनांक २१ नोव्हे.रोजी सीबीटी बैठकीच्या वेळी निवेदने देण्यात येतील.१ डिसेंबर रोजी आगामी लोकसभा अधिवेशनमुळे सर्व मंत्री व सर्व खासदार यांच्या स्थानिक कार्यालयासमोर ३ तास बैठा मूक सत्याग्रह व निवेदन देणे होईल. दि ९ डिसेंबरला दिल्लीत समितीची केंद्रीय कार्यकारिणी बैठक, होईल. त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनी अगोदर रेल्वेचे रिझर्वेशन करून आंदोलनात एकजुटीने सहभागी व्हावे.असे आवाहन केले आहे.दिल्लीत संसद अधिवेशनवेळी विविध कामगार प्रश्नी २५ नोव्हे,२ डिसेंबर,९ व १६ डिसे.रोजी व राज्यसभेत २६ नोव्हे.व ५,१२,१९ डिसे.रोजी राज्यसभेत उत्तरे,चर्चा होईल.त्यात नगर जिल्ह्याचे खासदार प्रश्न उपस्थित करतील.गोवा राज्यातील पेन्शनधारकांचा राज्यस्तरीय मेळावा २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जय संतोषी माता मंदिर सभामंडप न्यू वाडेम,वास्को द गामा गोवा येथे आयोजित करण्यात आली आहे.दिल्ली डिसेंबरच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सुभाष पोखरकर व सहकारी पदाधिकारी महाराष्ट्र राज्य,यांनी केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*संकलन*
समता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111