राहुरी प्रतिनिधी / जावेद शेख:
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व कुलसचिव डॉ. एम.जी. शिंदे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाने महात्मा फुले कृषि विद्यापीठात मतदान जागृती रॅलीचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के यांच्या मतदान जनजागृती समितीने केले. या रॅलीमध्ये बी.टेक, एम.टेक, एम.एस्सी (कृषि) व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यासह, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते.
याप्रसंगी उपस्थितांना डॉ. महावीरसिंग चौहान व श्री. वैभव बारटक्के यांनी येत्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणूकीमध्ये आपले हक्काचे मतदान निर्भिडपणे व स्वयंस्फुर्तीने, भारताचे जबाबदार व सुज्ञ नागरिक म्हणून संविधानाने बहाल केलेल्या अनमोल अशा मतदानाचा हक्क बजावण्याबाबतचे आवाहन केले. यावेळी डॉ. चौहान यांनी उपस्थितांना मतदान करण्याबाबतची मराठी व इंग्रजीतून शपथ दिली. याप्रसंगी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील कृषि प्रक्रिया विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास कांबळे यांनी उपस्थितांना मतदानाबाबत व आदर्श आचारसंहितेच्या पालनाबाबात मार्गदर्शन केले. याप्रसंगी समितीचे सदस्य डॉ. भगवान देशमुख, डॉ. सुनिल फुलसावंगे, डॉ. अधिर आहेर, विद्यापीठ क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रॅलीची सुरूवात कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयापासून मतदान जागृतीच्या घोषणा देत पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणावर आली व आभार झाल्यानंतर राष्ट्रगीताने रॅलीची सांगता करण्यात आली.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111