shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मेहंदुरी येथे २५ नोव्हेंबरला भव्य सत्संग मेळावा युवा संत चंद्रकांत दादा मोरे यांची उपस्थिती


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथे श्री स्वामी समर्थ मंदिर दरबार  स्थापना निमित्त तालुका स्तरीय भव्य सत्संग मेळावा गुरुपुत्र युवा संत चंद्रकांत दादासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये  सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला आहे.
    परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने मेहंदुरी येथे श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती व प्रतिमेची स्थापना करण्याच्या निमित्ताने युवा संत चंद्रकांत दादा मोरे हे आपल्या अमृततुल्यवाणीतून भाविकांशी हितगुज साधणार आहे. या निमित्ताने सत्संग मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

   या निमित्ताने अकोले तालुक्यातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्र दरबारामध्ये भाविकांचे छोटे छोटे मेळावे घेऊन या कार्यक्रमाचा प्रसार व प्रचार करण्यात आला. तालुक्यात सर्व गावांमध्ये फ्लेक्स लावून वातावरण निर्मिती केली आहे. तालुका निरीक्षक प्रमोद वाकचौरे, जे. के. मालुंजकर, जगन्नाथ देशमुख, रामदास बोंबले, गणेश मादास, सविता कोटकर, प्रतीक्षा पावडे यांनी विशेष प्रयत्न केले आहे.
  दादासाहेब यांच्या मेळावा च्या निमित्ताने मेहेंदुरी येथे महाराष्ट्र प्रतिनिधी विजय कडू पाटील, जिल्हा प्रतिनिधी माणिकराव वडतिले, प्रशासकीय प्रतिनिधी बाजीराव शिंदे, बाबासाहेब तळोदे आदीनी कार्यक्रम स्थळाची पहाणी केली.
 तरी सेवेकरी, भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गावचे सरपंच अमित येवले, केंद्र प्रतिनिधी संध्या आरोटे तसेच केंद्रातील सर्व सेवेकरी  यांच्या वतींने करण्यात आलेले आहे.
close