shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अहिल्यानगरचे पोलीस डी.वाय.एस.पी.भोसले यांनी खोटी "ॲट्राॅसिटी" करून पदाचा गैरवापर करत आहेत. त्यांची सखोल खातेनिहाय चौकशी करा...वडार समाज संघ


अहिल्यानगर प्रतिनिधी:-
सविस्तर वृत्त असे की देहरे येथे १३/०१/२०२४ रोजी वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली. व पुरावा नष्ट करण्यासाठी तीला दगड बांधून विहीरीत टाकण्यात आले.याच्या सबंधित देहरे येथील अनाधिकृत व अवैधरित्या धंदे करणारे अवैध टपरीधारक नामे नवनाथ रमेश जाधव रा. देहरे, तालुका नगर,जि.अहिल्यानगर यांच्यामार्फत पोलीसांना आंदोलकांनी भविष्यात त्रास देऊ नये या कारणासाठी सागर उत्तम धनवटे हेच अत्यंत मागास जमातीचे (वडार) समाजाचे असताना व प्रत्यक्ष टपरीजवळ उपस्थित नसताना डी वाय एस पी भोसले यांनी त्यांचेवर ॲट्राॅसिटी कायद्याचा १०० टक्के खोटा असलेला गुन्हा दाखल केला आहे. 

ॲट्राॅसिटी गुन्हा १००टक्के खोटा ..!

ते कसे तर ते पुढीलप्रमाणे 
     सविस्तर वृत्त असे की देहरे येथे एका अल्पवयीन मुलीची दि.१३/०१/२०२४ रोजी नवनाथ रमेश जाधव याच्या आरोपी नराधम भावाने नामे रुत्विक उर्फ गोट्या संजय जाधव वय- २३ वर्ष याने वडार समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर सलग अत्याचार करून डोक्यात व पाठीवर गंभीर तीव्र जखमा करुन हत्या करत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला बंगे यांच्या विहीरीत तीचे मृतदेह वरती येऊ नये म्हणून मोठा दगड बांधून पाच सहा जणांच्या (ज्यांचा तपास लाच मिळाल्याने करण्यात आला नाही) मदतीने टाकून दिले. याबद्दल दि.१३/०१/२०२४  ते  दि.१६/०१/१२४ दरम्यान एम आय डी.सी.पोलिस स्टेशनला दोनवेळा गुन्हा रजि. नोंद झाली आहे.
      यानंतर वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीची अत्याचार व अमानुषपणे हत्या करण्यात आल्यामुळे सकल वडार समाजाने लोकशाही पध्दतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन केले.याच्या प्रति सर्व संबंधितांना रजि.पोस्टाने पाठवण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक हंडाळ यांना वाचविण्यासाठी "ॲट्राॅसिटी कायद्याचा गैरवापर...!

या आंदोलनातील प्रमुख मागणी होती की एम आय डी सी पोलीस स्टेशन अ.नगर मधील लाचखोर उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ यांना बडतर्फ करून निलंबनाची कारवाई व देहरे अल्पवयीन मुलीच्या हत्येत सह आरोपी करावे. 
       याचे प्रमुख कारण अवैध धंदे (सोरट फुलचंद, मावा, गुटखा, पत्यांचा क्लब) करणारा नामें नवनाथ रमेश जाधव व भाऊसाहेब रमेश जाधव या आरोपीशी देवाण घेवाण असल्यामुळे त्यांनी नवनाथ पान टपरी येथे बसून लाच घेऊन अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या वेळी विहीरीत दगड बांधून टाकताना पाच सहा आरोपी असताना काही आरोपींचे नावे वगळण्यासाठी लाच घेऊन मदत केल्यामुळे वडार समाजाच्या आंदोलनावेळी उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ यांचेवर बडतर्फी ची व देहरे अल्पवयीन हत्याकांडात सह आरोपी म्हणून कारवाही होण्यासाठी तीव्र आंदोलन केले होते.याचे पडसाद संपुर्ण महाराषट्रात उमटले होते.

एम आय डी सी,नगर पोलीस स्टेशन गुन्हेगारांना देतात अभय?प्रामाणिक कार्यकर्ते यांना देतात खोट्या केसेस मध्ये गुंतवण्याची धमकी?

    या आंदोलनात सागर उ.धनवटे हे सामाजिक कार्यकर्ते आघाडीवर होते. सागर धनवटे यांना आंदोलन करू नका ,पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ यांचे आंदोलनात नाव घेऊ नका असे सांगण्यात आले. नंतर डी.वाय एस पी संपतराव भोसले व एम आय डी सी पो.स्टे.चे सहाय्यक निरीक्षक चौधरी यांनी सागर धनवटे यांना धमकी दिली की तुला सांगून जर नाही ऐकले तर मी एक वर्ष येथेच आहे,मग तुला जेलमध्ये सडवतो. परंतू सागर धनवटे यांनी वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीची अब्रु लूटून हत्या झाल्यामुळे पोलीसांच्या या धमकीला न जुमानता लोकशाही पध्दतीने महाराष्ट्रातील सकल वडार समाजाच्या पुढाकाराने दि.३/०२/२०२४ रोजी मोठे जनआंदोलन यशस्वी केले. 

याचा डी.वाय एस पी भोसले व एपीआय चौधरी यांनी मनात राग ठेवून नवनाथ रमेश जाधव व भाऊसाहेब(भाऊराव) रमेश जाधव यांचे पोलिसांशी चार पाच वर्षांपासून अवैध धंद्यामुळे लागे बांधे असल्यामुळे नवनाथ रमेश जाधव याच्याच गावगुंड आरोपी नराधम भावाने रुत्विक संजय जाधव याने अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या केलेली असताना नवनाथ पानटपरीचे मालक तथा अवैध धंदे व अवैध टपरीधारक नवनाथ रमेश जाधव  याच्यामार्फत सागर धनवटे व अजून पाच कार्यकर्त्यांवर  पोलीस कर्मचारी पो.उप.नि.चांगदेव हंडाळ यांना नोकरीतून वाचवण्यासाठी हंडाळ यांची साधी चौकशी न करताच सागर धनवटे व आणखी पाच जणांवर खोटे- नाटे आरोप करून आदीम जमातीचे जीवन जगत असलेल्या, सत्तेपासून वंचित असलेल्या (७३वर्षापासून विधानसभेत आमदार व खासदार नाही) वडार समाजाच्या सामाजिक व धार्मिक   कार्य करणाऱ्या सहा कार्यकर्यावर निव्वळ चुकीच्या पध्दतीचे पुरावे दाखवून जे कधीच घडले नाही, ज्यांनी साधी शिवीगाळ कधी केली नाही .
       अशा सागर धनवटे व आणखी पाच जणांवर "ॲट्राॅसिटी" चा शंभर टक्के खोटा गुन्हा दाखल केला गेला.खरे तर  "ॲट्राॅसिटी" कायद्याचा नाहक वापर होणे हितावह नसते. परंतू  आपल्या पदाचा गैरफायदा उचलत त्यांनी गरिब व सत्तेपासून वंचित असलेल्या वडार बांधवांवर करून अन्याय केला आहे. त्यामुळे अहिल्यानगरचे डी वाय एस पी. संपतराव भोसले व त्यांना साथ देणार्या दोषी अधिकारी यांची नार्को टेस्ट व तसेच पोलीसांचे ऐकून नाहक षडयंत्र रचून चुकीच्या पध्दतीने "ॲट्राॅसिटीचा" गंभीर गुन्हा दाखल करणाऱ्या समाज कंटक व आरोपीचा भाऊ नवनाथ रमेश जाधव व  भाऊसाहेब रमेश जाधव यांची देखील नार्को टेस्ट करण्यात यावी. कारण या घटना दिवसागणिक राजरोस होत आहेत. याला प्रतिबंध करणे गरजेचे आहे.
      "ॲट्राॅसिटी" कायद्याचा गैरफायदा अनेक जण घेत आहेत. .तसेच पोलीस अधिकारी डि.वाय एस पी संपतराव भोसले व त्यांचे एम आय डी सी.पोलीस स्टेशन येथील सहकारी अधिकारी यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून बडतर्फ करुन त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे.तसेच त्यांनी राजरोषपणे अवैधरितीने कमावलेल्या संपत्तीची व नातेवाईकांच्या नावे असलेल्या संपत्तीची सखोल खाते निहाय चौकशी करण्यात यावी.
     याचा अहवाल तातडीने शासन व प्रशासनास संघटनेला  देण्यात यावे. तसेच संघटनेने पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीचे तातडीने निरसण करण्यात यावे. व संघटनेला झालेला अहवाल प्राप्त करून द्यावा अन्यथा  जिल्हाधिकारी कार्यालय, अ.नगर व महाराष्ट्रभर सकल भटक्या विमुक्त-जाती जमाती व वडार समाजाच्यावतीने  यानंतर केव्हाही जन आंदोलन करण्यात येईल. या नंतर भविष्यात काहिही विपरीत घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार संबंधित   अधिकारी ,संबंधित पोलीस अधिकारी ,शासन व प्रशासन राहिल. याची प्रखर्षाने नोंद घ्यावी.असे वडार समाज संघाने निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रति पुर्वीच दिलेल्या आहेत.

१)मा.एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
२)मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब,उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
३)मा.अजितदादा पवार साहेब,
उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.
४)मा.प्रधान सचिव साहेब, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई- ३२.
५)मा.पोलीस महासंचालक साहेब,मुंबई.
६)मा.विभागिय आयुक्त साहेब,विभागीय आयुक्त कार्यालय ,नाशिक.
७)मा.पोलीस अधीक्षक साहेब,
 पोलीस अधीक्षक कार्यालय,अहिल्यानगर.
८)सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर.
९) मान गृह विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर.
यांना पुराव्यासह पाठविले आहेत‌.
close