shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूर विधानसभा..! शिवप्रहारने भूमिका घेतली नसती तर बाण ०४-०५ नंबरला गेला असता…!!


(फक्त एक व्यक्ती सगळे श्रेय स्वत: घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे त्यामुळे हा लेखन प्रपंच)

श्रीरामपूर
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवप्रहारने रामगिरी महाराजांच्या आदेशानुसार धनुष्यबाणचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या पाठीशी उभे राहून जी ताकद उभी केली.त्यामुळे लागलेल्या निकालात धनुष्यबाण क्रमांक दोनवर आहे.जे काही ५२ हजार ७२६ मते मिळाली.त्यात कोण्या एकट्या व्यक्तीचा वाटा नसून शिवप्रहार,शेतकरी संघटना व पक्षीय कार्यकर्ते यांचा वाटा आहे.शिवप्रहारने महंत रामगिरी महाराजांच्या सूचनेनुसार जर भूमिका घेतली नसती तर धनुष्यबाणचे सीट चार किंवा पाच क्रमांकावर गेले असते.त्यामुळे कोणीही एकट्याने ५२ हजार ७२६ मते धनुष्यबाणाच्या बाजूने मिळवले असा पेपरात बातम्या देवुन दावा करू नये.तो सत्य ठरणार नाही.शिवप्रहारने कोणाच्या कार्यावर कधी टिका केलेली नाहीये.

          दिनांक ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी बेटावरून निरोप आल्यानुसार माजी PSI,शिवप्रहारप्रमुख सुरजभाई आगे यांनी सरला बेटावर जाऊन रामगिरी महाराजांची भेट घेतली. त्यावेळी महाराजांनी असे स्पष्ट सांगितले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला अडचणीच्या काळात मदत केल्यामुळे आता आपण शिंदे यांना सहकार्य करायचे आहे,बाणाला मदत करा असा आदेश रामगिरी महाराजांनी केल्यामुळे शिवप्रहार त्याच दिवसापासून अगदी तळमळीने या लढ्यात उतरले. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत धनुष्यबाणचे उमेदवार भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांची साथ देऊन विविध ठिकाणी कॉर्नर मीटिंग, सभा,बैठका,गाव विजिट असे १०० पेक्षा जास्त ठिकाणी उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला.माजी PSI,शिवप्रहारप्रमुख सुरजभाई आगे यांनी श्रीरामपूर-राहुरी परिसरात लेकी-बाळींवर,हिंदू संस्कृतीवर झालेले अन्याय-अत्याचाराचे मुद्दे,
गाय-माय रक्षणाचे,शेती-माती परंपरेचे इतर हिंदुत्वाचे मुद्दे,रामगिरी महाराजांचा विषय या बाबी प्रखरपणे प्रत्येक भाषणात सांगितल्या.या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो,व्हिडिओ शिवप्रहारकडे आहे.परंतु शिवप्रहार ही बिगर राजकीय संघटना असून श्रीरामपूर पुरती घेतलेली भूमिका ही राजकीय होती.म्हणून हे फोटो आम्ही सोशल मेडीयावर व्हायरल केले नाही.तरी ज्या शिवप्रहारने व शिवप्रहारच्या मावळ्यांनी दिनांक ०५ नोव्हेंबर पासून तन-मन-धनाने धनुष्यबाणचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली त्यांचा उल्लेखही ह्या नेत्याने काही पेपरला लावलेल्या बातमीत केला नाही.या नेत्याने फक्त स्वतःच्याच बळावर हे सगळं झाले असल्याच्या बातम्या लावल्या आहे.परंतु ते तथ्य नाही.फक्त कोणी एका व्यक्तीने नाही तर मा.आमदार भाऊसाहेब कांबळेंचा मनमिळावू स्वभाव,साधी राहणी या गोष्टींबरोबरच  शिवप्रहार,शेतकरी संघटना व पक्षीय कार्यकर्त्यांनी मिळून हे ५२ हजार ७२६ मतदान खेचून आणले आहे. जे नेते म्हणत आहे की आमच्यामुळे एवढे मतदान घडवून आले ते स्वतः प्रचारात ०८ दिवसानंतर सहभागी झाले सुरुवातीला ते कानडेंना भेटले नंतर ते कांबळेंच्या प्रचारात काही अटी शर्तीवर सहभागी झाले.तरी असा दावा कोणीही करू नये की हे ५२ हजार ७२६ मतदान फक्त एका व्यक्तीमुळे झाले आहे.त्यांनी स्वतः जाहीर करावे की,किती सभांमध्ये त्यांनी मतदारांचे मनपरिवर्तन करून त्यांना धनुष्यबाणाच्या बाजूने वळवले ? त्यांनी जर शिवप्रहार पेक्षा जास्त सभेत सहभाग घेतला असेल तरच त्यांनी हा दावा करावा कि त्यांच्यामुळे एव्हढे मतदान झाले.
       शिवप्रहारने महंत रामगिरी महाराजांच्या सांगण्यानुसार प्रत्यक्ष निवडणुकीत उतरून धनुष्यबाणचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासोबत प्रचार केला नसता,सभा-कॉर्नर मीटिंग-बैठका घेतल्या नसत्या,सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली नसती तर धनुष्यबाण चार किंवा पाच क्रमांकावर राहिला असता.
(सध्या मोठे व्हिडिओ पाहीले जात नाही म्हणुन मोजक्याच सभा-बैठकांचे फोटो व्हिडिओत घेतले आहे.)
जय श्रीराम🚩जय शिवराय🚩
जय भिम🚩जय लहुजी🚩
close