shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मनमानी विरूध्द पोलीस अधीक्षकांकडे आर.पी.आय. पक्षाची तक्रार.

'रक्षकच बनत आहेत भक्षक.'.!

अहिल्यानगर प्रतिनिधी:-
देहरे गावातील मतदान केंद्रात शांततामय वातावरण असताना मतदान केंद्रात मतदान करुन बाहेर जात असताना एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन चे (A.P.I) माणिक भाऊसाहेब चौधरी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याबाबत अर्जदार जयराम सुरेश आंग्रे रा. देहरे ता.जि.अहिल्यानगर यांनी 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)या पार्टीच्या माध्यमातून अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांचेकडे लेखी तक्रार केली आहे.

     सविस्तर वृत्तानुसार त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मी जयराम सुरेश आंग्रे दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.२० वाजता मतदान करण्यासाठी गेलो होतो, त्या ठिकाणी मतदान करून बाहेर येत असतांना M.I.D.C पोलिस स्टेशनचे (A P.I) माणिक भाऊसाहेब चौधरी यांचे मतदान कार्यालयात काही लोकांना अश्लील शिवीगाळ चालू होती. तेथून मी मतदान केंद्राबाहेर चाललो असता त्यांनी मला विचारणा केली. तुझे इथे काय आहे, मी त्यांना सांगितले की मतदान करून बाहेर चाललो आहे. त्यांनी मला नाहक लगेच तेथून इतर बाजूला ढकलत ढकलत आणले. मी त्यांना विचारणा केली. साहेब काय झाले, मला का ढकलता आहे, तर त्यांनी मला कारण नसताना शिव्या देण्यास सुरुवात केली. मी त्यांना पुन्हा विचारले साहेब मला शिव्या का देताय? तर त्यांनी मला लगेच मारहाण चालू केली आणि, त्यांच्या समवेत पोलिस सहकारी उमेश शेरकर व किशोर जाधव ३ लोकांनी मला बेदम मारहाणं चालू केली. आणि मी विचारणा केली की मला का मारताय असे म्हणताच शिव्या देवू लागले व शांततामय वातावरण अशांततामय केले.
     तेव्हा मतदान कार्यालयात उपस्थित असणाऱ्या लोकांनी मला त्यांच्यापासून वाचवले.सदर घटनेत मला काहीही कारण नसतांना M.I.D.C पोलिस स्टेशनचे (A.P.I) माणिक भाऊसाहेब चौधरी त्यांचे समवेत उमेश शेरकर, किशोर जाधव यांनी मला मारहाण केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांनी मला जी अपमानास्पद वागणूक दिली. यावर लवकरात लवकर कारवाई करावी.अन्यथा पक्षाच्या वतीने उग्र स्वरुपात आंदोलन करण्यात येईल.आंदोलनाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहील. असे संघटनेच्यावतीने
जयराम सुरेश आंग्रे म्हटले आहे.
       सदर तक्रारीचे प्रती केंद्रीय सामजिक न्याय व राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमट साहेब,पालकमंत्री अ. नगर, मानवी हक्क आयोग, पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र,
 अनुसूचित जाती जमाती आयोग पाठवले आहेत.
तसेच दि.२१ नोव्हेंबर २०२४ चे जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे उपचार घेतले बाबत (M.L.C.)
नं. ९६०७ च्या प्रती जोडल्या आहेत.

      तरी एम आय डी सी परिक्षेत्रात ते रुजू झालेपासून अनेक खुनाचे व इतर घटना घडल्या आहेत.त्या घटनांचा तपास योग्य पध्दतीने झालेला नाही. अनेक ठिकाणी अवैध धंदे राजरोस घालु आहेत. त्या गोष्टीकडे जाणून बुजून डोळेझाक करून तक्रारदारांनाच खोट्या केसेस मध्ये गुंतवण्याचा प्रताप ते करत आहेत. अशा शासकीय पदाचा गेरवापर करणार्या व मग्रुर अधिकारी यांचेवर पोलीस अधीक्षक काय करतायत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
close