प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ३/ करमाळा तालुक्यातील राजुरी येथील आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाला धक्का बसला असुन भाजप प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या गाव भेट दरम्यान राजुरी येथील पिनू साखरे,भाऊ सराटे, संतोष मोहीते, मारुती साखरे, बापूसाहेब साखरे, आजिनाथ शिंदे, नाना साखरे, लक्ष्मण शिंदे, योगेश लांडगे, दादासाहेब जाधव, राहूल पाटील, सोनू साखरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला राम राम करत महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील अनेक दिवसांपासून करमाळा तालुक्यात आ. संजयमामा शिंदे गटाला गळतीचे सत्र सुरू असून पुढील आठवड्यात शिंदे व पाटील गटातून महायुतीला साथ देणाऱ्यांचे मोठे प्रवेश होणार असल्याची माहिती बागल यांच्या कडून देण्यात आली आहे. यावेळी राजुरी येथील प्रवेश केलेल्या सर्वांनी सांगितले की भाजप प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते दिग्विजय दिगंबरराव बागल यांना राजुरी गावांमधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
यावेळी मकाई सहकारी साखर कारखाना संचालक सतीश नीळ, अजित झांझूर्ने, काशीनाथ काकडे, गणेश झोळ, राजेंद्र मोहोळकर, साधनाताई खरात, सतीश झोळ इं. उपस्थित होते.