shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

संजय मांजरेकरची वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच


               क्रिकेट आणि वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या वादविवादाच्या जुगलबंदीत कधी क्रिकेटपटूंवर टिकाकार, समिक्षक, क्रिकेट चाहते तुटून पडतात तर कधी काही माजी क्रिकेटपटूच विद्यमान खेळाडूंवर आगपाखड करताie त. यात मुद्दा काहीही असू शकतो. मात्र टिका करणाऱ्याने ज्या खेळाडूवर टिका केली त्याच्यापेक्षा आपं .ली क्रिकेटपटलावर कामगिरी काय 'होती याचेही भान ठेवणे गरजेचे असते. मात्र काही माजी खेळाडू स्वयंघोषित विद्वान असतात. आपली लायकी नसतानाही आपल्या अकलेचे तारेचे तोडतात. परिणामतः अकुशल शिकाऱ्याप्रमाणे स्वतःच विणलेल्या जाळ्यात फसतात. मग त्यांचे जगभर जे हसू होते त्यातून त्यांच्याच इज्जतीचे लक्तरे जगाच्या वेशीवर टांगले जातात. असाच प्रकार सध्या भारताचा माजी तथाकथीत यशस्वी फलंदाज संजय मांजरेकरच्या वाणीद्वारे होत आहे..

                भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. मांजरेकरने अलीकडेच आयपीएल लिलावाबाबत शमीवर भाष्य केले होते, जे या वेगवान गोलंदाजाला आवडले नाही.  शमीने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे मांजरेकरांवर निशाणा साधला आणि व्यंगात्मकपणे त्यांना स्वतःकडेच राहण्यास सांगितले.  आयपीएल २०२५ साठी होणाऱ्या मेगा लिलावात शमीच्या किमतीत घट होईल, असा अंदाज मांजरेकर यांनी वर्तवला होता. 
               ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी शमीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून मांजरेकरांवर आपला राग काढला. शमीने लिहिले की, मांजरेकर यांनी त्यांची समजदारपणा स्वतःकडेच ठेवावा आणि भविष्यासाठी तो जतन करावा.  शमीने पोस्टमध्ये लिहिले की, जय बाबा. .थोडं ज्ञान तुमच्या भविष्यासाठीही जतन , k करा, उपयोग होईल संजयजी.  
                अलीकडच्या काळातील दुखापतींचा हवाला देत मांजरेकर म्हणाले की शमीचे मूल्य कमी होऊ शकते. शमीने तब्बल वर्षभरानंतर रणजी ट्रॉफीच्या पाचव्या फेरीत पुनरागमन केले. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्या नंतर शमी मैदानाबाहेर ने  होता. या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि तेव्हापासून तो भारतीय संघाबाहेर आहे. 
                एका स्पोर्ट्स चॅनलशी बोलताना मांजरेकर म्हणाले होते की, साहजिकच संघ स्वारस्य दाखवतील, परंतु शमीचा दुखापतीचा इतिहास पाहता आणि त्याला सावरण्यासाठी वेळ लागत असल्याने त्याला या हंगामात विश्रांती घेण्याचा धोका कायम आहे. जर फ्रँचायझीने त्याच्यावर मोठी किंमत लावली आणि हंगामाच्या मध्यभागी शमीची सेवा न मिळाल्यास संघासाठी पर्याय खूपच मर्यादित असतील.  या चिंतेमुळे कदाचित शमीची किंमत लिलावात पडू शकते. 
                दुखापतीतून सावरल्यानंतर शमी नुकताच रणजी ट्रॉफीच्या पाचव्या फेरीत मध्य प्रदेशविरुद्ध खेळला. या सामन्याद्वारे शमी ३६० दिवसांनंतर मैदानात परतला. बंगालकडून खेळताना शमीने दोन्ही डावात मिळून ४३.२ षटके टाकली आणि सात बळी घेतले. याशिवाय त्याने बॅटिंगमध्ये ३७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले.
                माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा वादांशी पहिल्या पासूनच संबंध आहे.  निवृत्तीनंतर बराच काळ कॉमेंट्री करणाऱ्या संजय मांजरेकर यांनी यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या विषयी चर्चा केली.  गंभीरला मीडियापासून दूर ठेवण्याची विनंती मांजरेकरने बीसीसीआयला केली आहे.  मांजरेकर यांनी सोमवारी सांगितले की, पत्रकारांशी बोलताना गंभीरकडे 'योग्य आचरण आणि शब्दांचा अभाव आहे, त्यामुळे बीसीसीआयने गंभीरला पत्रकारांपासून दूर ठेवावे.  गंभीरचा स्वभाव पाहता तो उत्तर दिल्या शिवाय शांत बसेल असे वाटत नाही.  खरं तर संजय मांजरेकरांनी असा 'शब्द बाण' वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही.
               संजय मांजरेकर यांनी २०१२ मध्ये विराट कोहलीवर केलेले ट्विट वेळोवेळी व्हायरल होत असते. कोहलीच्या सुरुवातीच्या काळात मांजरेकरचा त्याच्यावर विश्वास नव्हता आणि निवड समितीने या फलंदाजाला संघातून वगळावे अशी त्यांची इच्छा होती.  मांजरेकर यांनी ट्विट केले होते की, 'मी अजूनही व्हीव्हीएस सोडेन आणि पुढील कसोटीसाठी रोहितला घेईन. विराटची आणखी एक परीक्षा द्या...फक्त तो चहाचा कप नाही याची खात्री करण्यासाठी.
             रविंद्र जडेजा बद्दल विवादास्पद टिपण्णी मांजरेकरच्या तोंडून निघाली होती.  जडेजा आधी मांजरेकरचा मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू व वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार किरॉन पोलार्ड सोबतही वाद झाला होता.  इंडियन प्रीमियर लीगदरम्यान पोलार्डने मांजरेकर यांच्यावर आक्रमक टीका केल्याबद्दल त्यांना बोलावले होते.  पोलार्डला डावाच्या सुरुवातीला खेळायला मेंदू नाही, असे मांजरेकर म्हणाले होते.  प्रत्युत्तरात पोलार्डने ट्विट केले होते की, 'तुम्हाला वाटते की तुमच्या तोंडातून कोणतीही सकारात्मक गोष्ट निघू शकते, कारण तुम्हाला बोलण्यासाठी पैसे मिळतात, तुम्ही तुमचा शाब्दिक खेळ सुरू ठेवू शकता.'
              सन २०१९ मध्ये एका मुलाखतीत, संजय मांजरेकर यांनी रविंद्र जडेजाचे नाव घेतले होते आणि त्याला बिट आणि पीस खेळाडू (अर्धा गोलंदाज आणि अर्धा फलंदाज) म्हटले होते आणि संघात त्याच्या समावेशाच्या विरोधात होते. इंग्लंडकडून भारताच्या पराभवानंतर संजयने ही टिप्पणी केली. यानंतर जडेजानेही चोख प्रत्युत्तर दिले आणि म्हणाला, 'मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे.
              अशा वादात न पडणं खूप चांगलं असतं हे संजय मांजरेकर सारख्या बुजूर्गाला कळू नये यापेक्षा दुर्देव कुठले असू शकते ? व तेही देशाचा राष्ट्रीय संघ परदेश दौऱ्यावर असताना.
लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close