अकोले ( प्रतिनिधी ) संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, पण धर्म टिकवण्यासाठी मुले संस्कारक्षम बनवली पाहिजे, संस्कारी मुलेच संस्कृती टिकवतील त्यासाठी मुलांना आई वडिलांची सेवा करण्याची शिकवण दिली पाहिजे असे मत श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी चे गुरुपुत्र युवा संत चंद्रकांत दादासाहेब मोरे यांनी व्यक्त केले.
अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथे श्री स्वामी समर्थ मंदिर दरबार स्थापना दिनानिमित्त तालुकास्तरीय भव्य सत्संग मेळाव्यात दादासाहेब मोरे यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून भाविकांशी हितगुज साधले. अकोले चे आमदार डॉ किरण लहामटे, अगस्तीचे संचालक अशोक आरोटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
धर्माला ग्लानी येते तेव्हा देव अवतार घेतात, आज धर्म टिकवण्याची गरज असून ती आपली जबाबदारी आहे. त्यासाठी पुढील पिढ्या संस्कारीत बनवायला पाहिजे, आई वडिलांच्या सेवा करण्याची शिकवण त्यांना दिली पाहिजे, देवाची सेवा करून देव मिळेल की नाही हे सांगता येत नाही, परंतु आई वडिलांनाची सेवा केली तर देव नक्की मिळेल, अनाथ आश्रम, वृद्ध आश्रम बंद करायचे असेल तर मुलांवर संस्कार च महत्वाचे आहेत. वृद्धाश्रमात शेतकऱ्यां चे आई वडील नाही ही अतिशय सुखकारक गोष्ट आहे. शेतकरी वर्गाने संस्कार टिकवले आहेत. असे प्रतिपादन दादासाहेब मोरे यांनी केले.
दादासाहेब मोरे बोलताना म्हणाले की, जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरु होते, जो भाविक स्वामी चे चिंतन करतो तो चिंता मुक्त होतो, जेथे सगळे असमर्थ ठरतात तेथे फक्त स्वामी समर्थ ठरतात. जात, पात, धर्म, पुरुष, महिला असा कोणताही भेदभाव न करता त्यांचे दुःख निवारण विनामूल्य केले जाते असे केंद्र गावोगावी उभारून प्रत्येक घरात सेवेकरी निर्माण करायचा असल्याचे ही मोरे दादा यांनी सांगितले.
कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी तालुका निरीक्षक प्रमोद वाकचौरे, जे. के. मालुंजकर, जगन्नाथ देशमुख, गणेश मादास,रामदास बोंबले,सविता कोटकर, प्रतीक्षा पावडे, सरपंच अमित येवले, तसेच केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांनी विशेष प्रयत्न केले आहे.तसेच प्रचार प्रसार साठी मादास आवाज गणेश मादास, लाईट डेकोरेशन साठी भूषण आरोटे यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी खूप मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.