विश्वनाथ निर्वाण यांच्या अपक्ष उमेदवारीने
श्रीरामपूर विधानसभेचे समिकरण बदलणार
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, प्रत्येक पक्षाने आपापल्या परिने विविध ठिकाणी आपले उमेदवार निवडणूक रणांगणात धाडले आहे.
उमेदवारही शड्डू ठोकत विधानसभेची कुस्ती जिंकण्याकरीता तयारीनिशी सज्ज झाले आहेत.
त्यात आज्यभरात श्रीरामपूर विधानसभेचे चित्र यावेळी काही वेगळेसे आहे. याठिकाणी नेहमी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारास आमदारकीची संधी प्राप्त होत असे,मात्र पुर्वाश्रमीचे कॉंग्रेसचेच माजी चक्क दोन आमदार इतर पक्षातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत,शिवाय इतर राजकीय पक्ष आणी अपक्ष उमेदवार देखील आपले नशीब आजमावत आहेत,मात्र यामध्ये प्रामुख्याने महावितरण मध्ये क्लास वन अधिकारी राहिलेले तथा उच्च विचारसरणी आणी सर्वांना बरोबर घेवून चालण्याची क्षमता असलेले यासोबतच नेहमी समाजसेवेसाठी कार्यतत्पर असलेले समाजसेवक श्री. विश्वनाथ निर्वाण हे एक सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व आहे, ते २२० श्रीरामपूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत.ते महावितरण वीज वितरण कंपनीत वर्ग - १ अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या सेवानिवृत्ती नंतर त्यांनी समाजाच्या सेवेकरीता श्रीमती गंगुबाई निर्वाण सामजिक सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही संस्था स्थापन केलेली आहे.
यामार्फत सामाजातील उपस्थित, दुर्लक्षित यासोबतच जनसामान्यांची सातत्याने सामाजिक सेवा करत आहेत, अशी निर्पेक्ष आणी जनसामान्यांसाठी परोपकाराची भावना असणाऱ्या तथा सर्व जाती - धर्मांना सोबत घेवून चालणाऱ्या लोकसेवकाची आज सर्वांनाच नितांत आवश्यकता आहे.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले की, निवडणूकीत विजयी प्राप्त झाल्यास प्रथमतः आपण तालुक्यातील रोजगार निर्मितीस प्राधान्य देणार असून,श्रीरामपूर मध्ये नवनवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.यासोबतच सध्या असलेल्या एमआयडीसी चे पुनर्जीवन करणे.पाटचाऱ्या दुरुस्त करणे, शेतीमालाचे भाव कसे व्यवस्थित राहतील याकडे लक्ष देणे, तसेच वीज - पाणी इतर जनतेची मागणी आणि पुरवठा याचा योग्य ताळमेळ बसवला जाईल. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी दिली आहे. शेती साठी उन्हाळ्यात पाणी कसे राहील याचे नियोजन करण्यात येऊन योग्य ते ऑडिट करण्यात येईल. पाणी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येईल. श्रीरामपूर चा चेहरा - मोहरा बदलण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. सर्व समाजाचे प्रश्न कसे सोडवता येईल मग ते कोणत्याही प्रकारचे असो. असेही त्यांनी आश्वासन दिले आहे. एक सुशिक्षित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचेकडे पाहिले जात असून याच कारणास्तव स्वाभिमानी मराठा महासंघ महारष्ट्र राज्य या संघटनेने त्यांना पाठिंबा दिला असल्याने तथा विविध सेवाभावी सामाजिक संघटना देखील त्यांच्या नेहमीच पाठीशी असल्याने यावेळी श्रीरामपूर विधानसभेचे समिकरण बदलणार आहे.
करीता विश्वनाथ निर्वाण यांची उमेदवारी, भल्याभल्यांना पडू लागली भारी,उच्च विचारसरणी यासोबतच त्यांची कार्यपद्धती न्यारी म्हणून घेत आहेत श्रीरामपूर विधानसभा कार्यक्षेत्रात मोठी भरारी असे जनसामान्यांतून बोलले जात आहे.
*संकलन
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११