shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

*साहेबराव नंदन लिखित परिसस्पर्श कादंबरीस निळूभाऊ फुले साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

शिर्डी [ संजय महाजन ] साहित्यिक, कवी ,लेखक साहेबराव तात्या नंदन नाशिक लिखित, ज्ञानसिंधु प्रकाशन प्रकाशित, सौ. पुष्पलता पगारे यांच्या जिवनावर आधारीत अस्सल ग्रामिण बाजाची मनोवेधक, चरित्रात्मक परिसस्पर्श  या कादंबरीस  माणूसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जि बुलडाणा महाराष्ट्र राज्य  यांचा राज्यस्तरीय निळूभाऊ फुले साहित्य गौरव पुरस्कार २०२४ नुकताच जाहिर झाला आहे., तशा आशयाचे निवडपत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  विवेक सुभाष राजापूरे यांनी ऑनलाईन परिसस्पर्श कादंबरीचे लेखक साहेबराव तात्या नंदन यांना पाठवले आहे.

१५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक १२वा. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या हस्ते तालुका शिक्षक पतसंस्था हॉल मलकापूर जि. बुलडाणा येथे कार्यक्रम स्थळी निळूभाऊ फुले साहित्य गौरव ट्रॉफी  गौरवपत्र शॉल श्रीफळ मानाचा फेटा बांधून लेखक साहेबराव नंदन यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. परिसस्पर्श कादंबरी साठी मानाचा राज्यस्तरीय निळूभाऊ फुले पुरस्कार जाहीर झाल्याने, उत्तर महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीचे विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतीक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अभिनंदन केले आहे. ॲड बापूसो. संभाजीराव पगारे सौ. पुष्पलता पगारे, ज्ञानसिंधु प्रकाशनाचे प्रकाशक, तान्हाजी खोडे, सगर रत्न व दीपोत्सव परिवारातील संपादक मंडळ यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे.
close