श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामशेठ टेकावडे यांच्या प्रेरणेने एज्युकेशन सोसायटी संस्थे अंतर्गत सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ दरम्यान सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन दैनिक राष्ट्र सह्याद्री संपादक करण नवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे खजिनदार जन्मजय टेकावडे,पुरुषोत्तम बुब,ॲड. दादासाहेब औताडे,सुरेश ओझा,माजी प्राचार्य सुभाष गोरे ,सौ उषाताई मुंदडा ,सौ. संगीता कासलीवाल,सौ. रेखा घाटे,प्रा. दत्तात्रय घोगरे, प्रा. पोडघन,प्रा. करंदीकर यांच्यासह पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धा बरोबरच मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहेत. हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट,व्हॉलीबॉल खो-खो,कबड्डी,रस्सीखेच या सांघिक खेळांसह १०० मीटर धावणे,२०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे,लांब उडी,उंच उडी गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक यांच्यासह चित्रकला स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,संगीत स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज,श्रीराम अकॅडमी, एज्युकेशन सोसायटी प्राथमिक आणि माध्यमिक स्कूल या चार शाळा सहभागी होणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी या हिवाळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा न्यू इंग्लिश स्कूल येथे संपन्न होणार आहे.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111