विकासकामांच्या बळावरच आपण निवडणूकीला सामोरे आ. कानडे
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
गेल्या पाच वर्षात मतदार संघातील विकास कामांसाठी बाराशे ते तेराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दर्जेदार कामे होण्यासाठी आपण लक्ष दिले. या विकास कामांमुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला उमेदवारी दिली. या कामांच्या बळावरच आपण पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष व महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त आयोजित कडीत बु., कडीत खुर्द, मांडवे, फत्याबाद, कुरणपूर, उक्कलगाव व एकलहरे या गावात झालेल्या सभांमध्ये आ. कानडे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, तालुकाध्यक्ष देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, नानासाहेब शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, अँड जयंत चौधरी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, सरपंच सागर मुठे, सरपंच गणेश कोतकर, सरपंच किशोर बकाल, आबा पवार, संदीप चोरगे, सुरेश पवार, अक्षय नाईक, किशोर कांबळे, आकाश क्षीरसागर आदीं उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले की, महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय यापूर्वी कोणत्या सरकारने घेतले नाहीत. साडेसात हॉर्स पावरची वीजबिले माफ करणे, मागची बिले शून्य करणे, प्रत्येक घरातील महिलांना लाडकी बहीण समजून महिन्याला पंधराशे रुपये देऊन योजना राबविणे, गरीब महिलांना मोफत तीन सिलेंडर देणे, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देणे, अशा अनेक योजना या सरकारने राबविल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी दिला श्रीरामपूर तालुक्याच्या दृष्टीने पालकमंत्री विखे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये शंभर वर्षांपासूनचा आकारिपडीत जमिनीचा प्रश्न त्यांनी सोडविला. गावठाण नसलेल्या सर्व गावांना शेती महामंडळाच्या जमिनी दिल्या. श्रीरामपूरसाठी २२ एकर जमीन दिली. शहरातील सर्व झोपडपट्ट्याचे नवीन इमारती बांधून पुनर्वसन होईल एवढी जागा त्यांनी दिली.
राजकारणातील बदल हे केवळ सेवेसाठी, समाजाच्या कल्याणासाठी असतात. राजकारण हे सर्व समाज गुण्यागोविंदाने एकत्र नांदेल, त्यांच्यात तेढ निर्माण होणार नाही, यासाठी असते. राजकारण आपला धंदा नाही. समाजसेवेसाठी आपण काम करीत आहोत. ज्यांनी मला धोका दिला, दगाफटका केला, त्यांचे मी आभार मानतो. कारण त्यामुळेच मी विकासाची परंपरा असणाऱ्या आणि विकास प्रशासनात मी ज्यांच्यासोबत काम केले त्या मंडळींमध्ये मी पुन्हा एकदा आलो आहे. ज्यांनी कट कारस्थान केले, त्यांच्याशी माझा काय वाद होता, बांधाला बांध होता का, त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. माझ्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला त्रास दिला, अन्याय केला, असे तुम्हाला वाटत असेल तर 20 तारखेला मला न्याय देण्याची भूमिका तुम्हाला घ्यायची आहे, असे आवाहन आ. कानडे यांनी केले.
अविनाश आदिक म्हणाले, आ. कानडे यांनी श्रीरामपूर तालुक्यात विकासाची कामे केली. स्व. गोविंदराव आदिक यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम ते करत आहेत. मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी आणून विकास कामे झाली आहेत. श्रीरामपूर बेलापूर रस्ता, बाबळेश्वर नेवासा रस्ता, याशिवाय ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची कामे झाली आहेत. काम करणारा आमदार असल्याने पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुन्हा संधी दिली आहे. या संधीचे मतदानाच्या माध्यमातून सोने करावे.
यावेळी साहेबराव होन, रंगनाथ तमनर, काशिनाथ वडीतके, रामदास वडीतके, लक्ष्मण मेंनगर, शिवाजी होन, ऍड. बनसोडे, रावसाहेब वडीतके, सतीश कानडे, ज्ञानेश्वर वडीतके, बाळकृष्ण वडितके, जालिंदर हिरवळ, भागवत बनसोडे, आबासाहेब वडीतके, संपत चितळकर, शंकर चितळकर, मुक्ताजी पटांगरे, अण्णासाहेब देठे, बाळासाहेब जांभुळकर, राधाकृष्ण तांबे, अण्णासाहेब ढोणे, अण्णासाहेब वडीतके, प्रा. एकनाथ ढोणे, तुकाराम चिंधे, सुभाष हळनोर, संग्राम आठरे, दगडू पावले, बाबासाहेब आठरे, रमेश बेलकर, शिवाजी आठरे, भाऊसाहेब शिंदे, कबीर पटेल, हसन पटेल, चांद पटेल, रामदास देठे, सखाहरी देठे, शामराव चिंधे, लक्ष्मण चींधें, मच्छिंद्र पारखे, प्रमोद लोंढे, राजेंद्र चींधे, हनुमान चींधे, अण्णासाहेब शिंदे, संजय कुदनर, जिजाबा वडीतके, सरपंच शिवाजी चींधे, उपसरपंच दत्तू माळी, सोहम चींधे, वसंत थोरात, दिलीप थोरात, प्रकाश जगधने, कारभारी सोन्याबापू थोरात, बबन निवृत्ती थोरात, विनोद थोरात, अन्सार शेख, लाल मोहम्मद जहागीरदार, ताज मोहम्मद शेख, सुदाम बर्डे, सुनील पवार, बाळासाहेब खैरे, अनिस शेख, विलास ठोंबरे, संजय अग्रवाल, मन्सूर जहागीरदार आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*संकलन
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - ९५६११७४१११