*यावेळी दुसरं - तीसरं कोणीच नको*
*केवळ हवे फक्त विश्वनाथ निर्वाण !!*
अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण यांना स्वाभिमानी मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
जनसामान्यांचे नेतृत्व उपेक्षित आणी दुर्लक्षितांचा आधारवड यासोबतच उच्च विचारसरणी तथा उच्चशिक्षित,उदारमतवादी व्यक्तीमत्व असलेले श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण यांना स्वाभिमानी मराठा महासंघाने जाहिर पाठिंबा दिल्याने श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक यावेळी मोठी चुरशीची ठरणार आहे..
श्रीरामपूर तालुक्याचे आधुनिकीकरण तसेच विकसनशिलदृष्ट्या प्रगती व्हावी हेच उद्दिष्ट आणी ध्येय घेऊन सर्वसामान्य,गोरगरिब, शेतमजुर,कामगार वर्ग, महिला आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच विविध क्षेत्रातील असंघटित कामगार तथा जनसामान्य नगगरीक यांच्या विविध प्रश्नांवर कामकाज हाताळणारे सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजेच श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले विश्वनाथ निर्वाण होय.
श्री.निर्वाण हे महावितरण कंपनीत वर्ग १ अधिकारी म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी श्रीमती गंगुबाई निर्वाण सामजिक सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेची स्थापनाकरुन आजवर विविध सामाजाभिमुख कार्य पार पाडले आहे.या माध्यमातून ते सातत्याने आपली अविरत सामाजिक सेवा करत आहेत.
प्रत्येक रित्या हाताला काम पाहिजेच म्हणून त्यांनी प्रथम प्राधान्य रोजगार निर्मितीला दिला आहे. श्रीरामपूर मध्ये नवीन उद्योग आणणे. सध्या असलेल्या एम.आय.डी.सी. चे पुनर्जीवन करणे, पाट चाऱ्या दुरुस्त करणे, शेतीमालाचे भाव कसे व्यवस्थित राहतील याकडे लक्ष दिले जाईल मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ घातला जाईल. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमीच त्यांनी दिली आहे. शेती साठी उन्हाळ्यात पाणी कसे राहील याचे नियोजन करण्यात येऊन योग्य ते ऑडिट करण्यात येईल. पाणी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येईल, श्रीरामपूरचा चेहरा मोहरा बदलण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
सर्व समाजाचे प्रश्न कसे सोडवता येईल मग ते कोणत्याही प्रकारचे असोत असेही त्यांनी आश्वासन दिले आहे. एक सुशिक्षित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते आहे ,याच कारणास्तव स्वाभिमानी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना जाहिर पाठिंबा दिला आहे, यामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत तथा अभिनंदन होत आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील जागरुक मतदारांचे देखील यावेळी एकच लक्ष आणी एकच ध्यान असल्याने यावेळी दुसरं - तीसरं कोणीच नको तर लोकप्रतिनिधी म्हणून हवे ते फक्त विश्वनाथ निर्वाण च अशा चर्चेचा सुर निघत असल्याचे जाणवते आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमानी मराठा महासंघाच्यावतीने करण्यात आले होते, प्रास्ताविक डॉ. कृषीराज टकले यांनी केले तर स्वागत शरद खांदे यांनी, आणी आभार सुभाष गागरे यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११