*केंद्र शासनाने साखरेच्या किमान विक्री दरात ४२०० ते ४५०० रुपये वाढ करावी; हिम्मतराव धुमाळ
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू असलेला व अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अधिपत्याखालील अशोक सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४ - २५ या ६८ व्या ऊस गळीत हंगामाचा विधीवत पूजनाने बुधवार (ता.१३) रोजी शुभारंभ करण्यात आला. कारखान्याचे व्हा.चेअरमन हिम्मतराव धुमाळ, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे काका, माजी चेअरमन सुरेश गलांडे, कोंडीराम उंडे, रावसाहेब थोरात, ज्ञानदेव साळुंके, सोपानराव राऊत, भाऊसाहेब उंडे, संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, माजी सभापती प्रा.डॉ.सुनिताताई गायकवाड, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदी मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरुन बोलतांना ‘अशोक’ चे व्हा.चेअरमन हिम्मतराव धुमाळ म्हणाले की, ऊसाच्या एफ.आर.पी. मध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली असून त्या प्रमाणात साखरेच्या किंमतीत वाढ झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात ४२०० ते ४५०० रुपये आणि इथेनॉलच्या दरात वाढ करावी अशी मागणी केली. याबरोबरच शासनाने रॉ-शुगर निर्यातीला परवानगी देणे गरजेचे आहे. ‘अशोक’ सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देणार असून सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पिकविलेला संपूर्ण ऊस अशोक कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहनही श्री.धुमाळ यांनी केले.
प्रारंभी कारखान्याचे संचालक यशवंत बनकर व त्यांची पत्नी सौ.स्वातीताई बनकर आणि कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विजयकुमार धुमाळ व त्यांची पत्नी सौ.अरुणाताई धुमाळ यांचे हस्ते विधीवत गव्हाण पूजन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी अशोक बँकेचे चेअरमन ॲड्.सुभाष चौधरी, रा.यु.काँ. माजी जिल्हाध्यक्ष युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे,भास्करराव मुरकुटे, काशिनाथ गोराणे, मार्केट कमिटीचे संचालक किशोर बनसोडे, मयुर पटारे, नाना पाटील, कारखान्याचे संचालक पुंजाहरी शिंदे, ज्ञानदेव पटारे, बाबासाहेब आदिक, आदिनाथ झुराळे, विरेश गलांडे, प्रफुल्ल दांगट, रामभाऊ कसार, यशवंत रणनवरे, सौ.हिराबाई साळुंके, सौ.शितल गवारे, अमोल कोकणे, योगेश विटनोर, ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर काळे, अच्युतराव बडाख, कार्यलक्षी संचालक गिताराम खरात, अशोक पारखे, हरिदास वेताळ, कचरु औताडे, ॲड्.डी.आर. पटारे, नारायण बडाख, शिवाजीराव शिंदे, संजय लबडे, बाळासाहेब दांगट, युवराज थोरात, बी.डी. बडाख, भाऊसाहेब पटारे, नानासाहेब मांढरे, भास्करराव बंगाळ, गणेश छल्लारे, सौ.शालिनीताई कोलते, शामसुंदर बडाख, भिकचंद मुठे, विश्वनाथ शेजुळ, ज्ञानदेव वर्पे, भैरव कांगुणे, बबनराव आसने, रमाकांत बोर्डे, बाळासाहेब आसने, पंढरीनाथ पटारे, दत्तात्रय नाईक, ज्ञानदेव पवार, भाऊसाहेब बनसोडे, सुनिल बोडखे, आशिष दोंड, रामदास पटारे, साहेबराव गायकवाड, कारभारी तागड, बाळासाहेब विधाटे, आण्णासाहेब काळे, विराज आंबेकर, अण्णासाहेब गारडे, अण्णासाहेब गोपाळे, प्रकाश भोसले, रविंद्र बनकर, विकास बोर्डे, प्रा.संपत देसाई, प्रा.रईस शेख आदींसह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, हितचिंतक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111