श्रीरामपूर / प्रतिनिधी:
दि आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या वतीने भारत प्रोजेक्ट अंतर्गत संपूर्ण भारत देशात उपक्रम राबविण्यात येत आहे तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या वतीने व महाराष्ट्र शासन याच्या सहकार्याने आरोग्य व योगा सेंद्रिय शेती जलसंधारण या व इतर अनेक कामांचे नियोजन केले जाणार आहेत त्याचा शुभारंभ अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून शुभारंभ झाला असून
या संदर्भांत आशिर्वाद व मार्गदर्शन. प्रशिक्षण घेण्यासाठी श्रीरामपूर येथील दि आर्ट ऑफ लिविंग परिवारातील सदस्य व अनेक शेतकरी बांधव गुरुजींचा आशीर्वाद घेण्यासाठी बेंगलोर येथील श्री श्री रविशंकरजी यांच्या संस्थेत भेट देऊन आले.
यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कसार (सर) यांचा भारत प्रोजेक्टमध्ये उत्तम कार्य केल्याबद्दल श्री श्री रविशंकर जी यांनी त्यांचा व त्यांच्या पूर्ण भारत प्रोजेक्ट अभियानातील सदस्यांचा सत्कार केला. प्रसंगी अहिल्यानगर जिल्ह्यातील भारत प्रोजेक्ट अभियानाचे समन्वयक पद्मा कुलकर्णी यांनी सांगितले की श्री श्री रविशंकर जी यांच्या आशीर्वादाने या चळवळीला सुरुवात झाली असून श्रीरामपूर तालुक्यात आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान देखील राबवले गेले व सोमवारी १८ तारखेला श्रीरामपूर शहरातून भव्य अशी मतदार जनजागृती पदयात्रा दि आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या वतीने काढण्यात येणार आहे. श्रीरामपूर तालुका सोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर तालुक्यात देखील याच पद्धतीने अभियान राबवले जाणार आहे या प्रसंगी आर्ट ऑफ लिविंग संस्थेचे भारत प्रोजेक्ट अभियानाचे प्रमुख संदीप पवार सर तसेच श्रीरामपूर तालुक्यातील पवन सरगये,सुभाष गड्डम, एकनाथ जोंधळे, संजय सहाणे, बॉबी बकाल, रावसाहेब काळे,मीनानाथ शेपाळ, राजेंद्र थोरात, श्रीकांत भणगे, केशव सवयी, जितेंद्र मापारी, मनीषाताई फरगडे तसेच आर्ट ऑफ लिंक संस्थेचे अनेक सदस्य व शेतकरी या प्रसंगी उपस्थित होते. या सर्वांचे आभार संदीप कसार सर यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111