बोली भाषेतून लिहिलेल्या कविता फक्त मराठीच्या विविध बोली भाषेतून लिहिलेल्या कविता अपेक्षित
कोल्हापुरी, चंदगडी, मराठवाडी, वऱ्हाडी , बेळगावी, मालवणी, मॉरिशस मराठी, झाडी बोली, तंजावर मराठी , बागलाणी, नंदुरबारी, डोंगरागी, जामनेरी, खान्देशी, अहिराणी, माणदेशी, आदिवासी भाषा, तसेच कोंकणी या स्वतंत्र भाषेतील कवितांचा देखील या स्पर्धेत समावेश करण्यात येईल
या शिवाय मराठी भाषेचा उपयोग ज्या ज्या बोलीत होतो त्या त्या बोली भाषा मधील कविता या स्पर्धेत सहभागी करून घेतल्या जातील.ज्या बोली भाषा संपुष्टात येताना दिसत आहेत अशा इतर बोलीतील कविता देखील सहभागी करून. घेतल्या जातील
सातारा / प्रतिनिधी:
मराठी भाषेत काव्य लेखन करणाऱ्या सर्व कवी व कवयित्री यांना कळविण्यात येते की मराठी बोली भाषेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ काम करीत आहे. महाराष्ट्रातील मराठी बोली भाषा, संस्कृती व आदिवासी बोलीभाषा यांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी भाषामंडळ कार्य करते. या उद्दिष्टाची पूर्ती करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन विद्यापीठात केले जात आहे. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही मराठी बोली कविता लेखन स्पर्धा घेत आहोत. कविता हा मनाचा उत्कट आविष्कार असतो, तसेच कविता ही एक कला देखील आहे.
आपण ज्या परिसरात वाढतो तिथल्या बोली या आपले भावजीवन समृद्ध करीत असतात. कधी कधी आपल्या स्थानिक बोलीभाषेला आपण साहित्य आविष्कारात कमी स्थान देत असतो. वास्तविक आधुनिक काळात देखील परंपरेने चालत आलेले व नवीन तयार होणारे बोलीतील अनेक शब्द मागे राहतात.त्या बोलीतील शब्दांचा वापर न झाल्यास ते लोप पावत जातात. अशा बोलीभाषेतील शब्दांचे, अर्थाचे जतन होण्यासाठी, तसेच बोली भाषेला महत्व प्राप्त करून देण्यासाठी आपण आवर्जून मराठी बोली कवितालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बोलीभाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठीच्या या कवितालेखन स्पर्धेत आपण सहभागी व्हावे ही विनंती.
*स्पर्धेचे नियम
१ मराठी तसेच कोकणी भाषा बोलणाऱ्या जगातील कोणत्याही कवीस या स्पर्धेत सहभागी होता येईल.
२ कवितेच्या कोणत्याही प्रकारात बोली भाषेतून कविता लेखन करता येईल. कवितेची शब्द मर्यादा १०० ते १५० शब्द इतकी असेल. कवितेस विषयाचे बंधन नाही . ही स्पर्धा खुली स्वरुपाची असल्याने कोणीही यात सहभागी होऊ शकेल
३. एक कवी एक अथवा अनेक कविता पाठवू शकेल, एक कवितेसाठी रुपये १०० /- इतके नोंदणी शुल्क पाठवणे आवश्यक राहील. कोण्याही एका कवीस अनेक कविता पाठवायच्या असतील तर त्याने प्रत्येक कवितेचे फक्त १०० रुपये भरणे आवश्यक राहील.
४.आलेल्या सर्व कवितांचा स्पर्धेत समावेश केला जाईल. स्पर्धेसाठी आलेल्या मराठी बोलीतील कवितांचे कवी परीक्षक यांचेकडून मूल्यमापन केले जाईल.
५. बोलीभाषेतून लिहिलेल्या व परीक्षकांनी उत्कृष्ट ठरविलेल्या पहिल्या तीन कवितांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास रु.५००० /- द्वितीय क्रमांकास ४००० रुपये व ,तृतीय क्रमांकास ३००० रुपये असे पारितोषिक असेल. तसेच उत्तेजनार्थ दहा पारितोषिके असून प्रत्येकास ५०० रुपये पारितोषिक देण्यात येईल. या पारितोषिक विजेत्या कवीला विशेष समारंभात प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल
७ कवींनी पाठवलेल्या कवितेतील प्रत्येक कवीच्या एका कवितेची निवड करून प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित करण्यात येईल. कोणती कविता प्रकाशित करावयाची याचे अधिकार संपादक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांना असतील
८ कविना वयाची कोणतीही अट असणार नाही मात्र कविता स्व हस्ताक्षरात लिहून पाठवावी. आपल्या कविता स्व रचित असल्याचे प्रतिज्ञापत्र कवितेसोबत पाठवणे आवश्यक आहे.
९.कवींनी आपल्या कविता समक्ष द्याव्यात अगर प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,मराठी विभाग प्रमुख,छ.शिवाजी कॉलेज, सातारा या पत्त्यावर पोस्टाने अगर कुरियरने २० नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत पाठवाव्या. तसेच एका कवितेसाठी फक्त रुपये १०० /- इतके प्रवेश शुल्क 9890726440 या मोबाईल नंबरवर फोन पे, गुगल पे द्वारा पाठवून द्यावेत.नोंदणी शुल्क घेतल्याची रीतसर पावती प्रत्येक कवीस देण्यात येईल. एका कवीने एकच कविता प्रातिनिधिक कवितासंग्रहात घेऊन प्रकाशित केली जाईल . प्रत्येक कवीस एक कवितासंग्रह भेट दिला जाईल.अधिक हव्या असतील तर तसे अगोदर कळवावे. हव्या असणारया कवितासंग्रहाचे मूल्य घेऊन इतर प्रत देणे शक्य होईल
१०. सहभागी सर्व कवींना स्पर्धेत सहभागी झाल्याचे एक प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
मराठी विभाग प्रमुख व छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
प्र.संचालक ,भाषा मंडळ, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ , सातारा
यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*संकलन
समता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११