नाशिक प्रतिनिधी / माजिद खान:
गोल्डन होरायझन स्कूल नाशिक हे शिक्षण क्षेत्रात काम करण्याबरोबरच सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवत आलेले आहे. "Speak for Nashik" Project 1 हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, गोल्डन होरायझन स्कूल तर्फे "Speak for Nashik" Project 2 हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. सदर उपक्रमांतर्गत नाशिक शहराला भेडसावणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदर उपक्रमांतर्गत नागरिकांना ट्रॅफिक विषयी जनजागृती करीता वर्कशॉप घेणे , ट्राफिक ची समस्या कमी करण्यासंदर्भात नागरिकांचा सहभाग वाढविणे तसेच नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देणे, तसेच ट्रॅफिक मॅनेजमेंट मधल्या त्रुटी शोधणे व त्यावरील उपाययोजना सुचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असणार आहे.
सदर उपक्रमाचे उद्घाटन नाशिक वाहतूक विभागाचे श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, नाशिकशहर यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी श्री. दिनकर कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व श्री. सचिन जाधव, पोलीस हवालदार,शहर वाहतूक विभाग,नाशिक शहर हे उपस्थित होते . श्री खांडवी यांनी ट्रॅफिक संदर्भात जनजागृती करताना नागरिकांच्या जबाबदाऱ्या तसेच नागरिकांचा सहभाग तसेच वाहतूक नियमांचे पालन केल्यामुळे रस्ते वाहतूक अतिशय सुरक्षित करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमास शाळेचे चेअरमन श्री संदीप गोयल व प्राचार्य शैला थॉमस उपस्थित होत्या तसेच त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना "Speak for Nashik" Project 2 साठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्रीमती सिमरन सुखवाणी व पल्लवी बागुल, हर्षिका दर्याणी, राखी पांडव यांनी विशेष प्रयत्न केले.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111