प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी* :-
केज विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांनी विकासाचे जाळे विणले आहे. लोकनेत्या आ.पंकजा मुंडे, माजी खासदार प्रितमताई मुंडे यांची भक्कम साथ व भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांचे मार्गदर्शन या सौ.नमिता मुंदडा यांच्या जमेच्या बाजू आहेत.
केज विधानसभा मतदारसंघात अखंडित वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवे अतिरिक्त १५ विद्युत उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असून , सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) योजनेद्वारे संपूर्ण मतदारसंघात ८० कोटींची कामे केज विधानसभा मतदारसंघात प्रगतीपथावर आहेत.
केज व अंबेजोगाई तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येची आणि शेती पंपांची विजेची वाढती मागणी लक्षात घेता , शेती पंप आणि गावठाण यांचा विद्युत पुरवठा वेगळा करून अखंडितपणे विद्युत पुरवठा करण्याचे आ.नमिता मुंदडा यांचे ध्येय आहे.
अतिरिक्त प्रमाणात ट्रान्सफॉर्मर , विद्युत खांब आदींची उभारणी संपूर्ण केज विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवार सौ . नमिता अक्षय मुंदडा यांनी आणलेल्या भरघोस निधी मुळे प्रगतीपथावर आहेत.
यातील बहुतांश कामे मार्गी लागले आहेत विशेष म्हणजे हे सर्व कामे दर्जेदार कसे होतील या कडे वेळोवेळी भाजप महायुतीच्या उमेदवार सौ.नमिता मुंदडा या जातीने लक्ष देत आहेत.