shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमीचा तीसरे. वार्षिक म्युझिकल उत्सव संपन्न


नगर / प्रतिनिधी:
संगीतला भाषा नसते, परंतु ते आपण जेव्हा मन लावून ऐकतो तेव्हा प्रत्येकाला ते भावत असते. सुख-दु:खात मनाला प्रसन्नत्ता लाभते. ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमी आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत परिक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देत आहे. यातून संगीत संस्कृतीचे आदान-प्रदान होत असल्याने त्या माध्यमातून देश-विदेशातील संगीत जाणून घेण्याची संधी मिळते. ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले यश कौतुकास्पद असेच आहे असे विद्यार्थ्यांच्या पालकांना व नगरकरांना वाटते. 

नगरमधील ग्रेस म्युझिकल अ‍ॅकॅडमीच्या तीसरे वार्षिक उत्सव संपन्न झाले. या म्युझिकल उत्सवाचे प्रमुख
पाहुणे म्हणून सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर करुणा शेंडे, ऑग्जिलियम कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सिस्टर निलिमा रॉड्रिग्ज,सेंट मायकल स्कूलच्या मुख्याध्यापिका नाँदिता डिसोझा, ज्ञानसंपदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर, ग्रेस फाउंडेशनचे सेक्रेटरी लिओ पंडीत आदि उपस्थित होते.
आपल्या प्रास्तविकात पिटर पंडित म्हणाले, ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमी ही अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अ‍ॅकॅडमी आहे जी लंडन येथील ट्रिनिटी कॉलेजशी संलग्न आहे. अ‍ॅकॅडमीचे तीसरे वार्षिक म्युझिकल उत्सवात आंतरराष्ट्रीय संगीत परिक्षेतील २७ यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रिनिटी कॉलेज लंडनचे सर्टिफिकीट देऊन सन्मानित करण्यात आले. तर ५० विद्यार्थ्यांना अ‍ॅकॅडमीचे सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी अ‍ॅकॅडमीत शिकलेल्या कलेचे उपस्थितांसमोर उत्कृष्टपणे सादरीकरण केले. मराठी-हिंदी-इंग्रजी गीतांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. 
सूत्रसंचालन विणा दिघे यांनी केले. तर आभार सौ.सोनाली पंडित यांनी मानले. 
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अहमदनगर 
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close