श्रीरामपूर [ प्रतिनिधी ] महाराष्ट्र होमगार्ड संघटनेच्या ७८ वा वर्धापन दिनानिमित्त शिर्डी या ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच प्रतिमा पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिर्डी विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी मा श्री शिरीष वमने साहेब यांनी भूषविले उपस्थित सर्व होमगार्ड बांधवांना मार्गदर्शन करताना श्री वमने साहेब म्हणाले .कायदा सुव्यवस्था तसेच सण . उत्सव . निवडणुका अशा विविध कालावधीत होमगार्ड बांधवांकडून अतिशय चांगल्या प्रकारे सेवा सहकार्य मिळत आहेत तसेच होमगार्ड संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून भव्य रक्तदान शिबिर . वृक्षारोपण . स्वच्छता अभियान ही संकल्पना खरोखरच अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन केले
पोलीस निरीक्षक मा श्री रामकृष्ण कुंभार यांनी उपस्थित सैनिकांना शुभेच्छा व्यक्त करत भरती विषयक माहिती विशद केली तसेच
पोलीस निरीक्षक मा श्री संदीप कोळी साहेब यांनी गृहरक्षक दलाच्या माध्यमातून देश सेवा करण्याची मोठी संधी आपणास प्राप्त झाली असल्याची माहिती दिली
कार्यक्रमाचे आयोजन अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक आहिल्या नगर मा श्री प्रशांत खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा श्री संजय शिंदे साहेब केंद्र नायक अहिल्यानगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी शिवदे साहेब यांचा विधानसभा निवडणुकीतील महत्वाच्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला
तसेच आयोजन समितीच्या वतीने मान्यवरांचा शाल बुके श्री साईबाबांची प्रतीमा भेट देऊन सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे आयोजन मा श्री संदीप शिंदे .मा श्री अंकुश आहेर .मा श्री प्रदीप परसपाटकी मा श्री कैलास खरात मा श्री प्रसाद तुरकणे मा श्री अनिल गायकवाड पत्रकार मा श्री राजेंद्र देसाई .मा श्री छोटू शेख आदींनी केले होते यावेळी होमगार्ड बांधवांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान केले उपस्थित सर्व होमगार्ड बांधवांना उपविभागीय पोलिस अधिकारी मा श्री शिरीष वमने साहेब यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होमगार्ड सैनिक शुभम अंभोरे
दिलीप जाधव . मिलिंद गुंड
गणेश साळुंखे अरुण पवार
भगवान अनाप . दत्तात्रय आहेर बाबासाहेब शेलार अनंत गोडसे
प्रशांत भालेराव प्रमोद येवले
श्रीमती सुनिता थोरात आदि प्रयत्नशील होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेंद्र देसाई यांनी केले तर प्रास्ताविक श्री संदीप शिंदे यांनी करत आभार श्री प्रदीप परसपाटकी व अंकुश आहेर यांनी मानले