देवतारी त्याला कोण मारी या वाक्याप्रमाणे वयाच्या तिसऱ्या वर्षी एकापाठोपाठ भले मोठे आजार नशिबी मिळाल्याने काय दुःख सोसले असेल अवयव निकामी झाले आणि मी जगण्याचा विचार सोडून दिला पण देव तारी त्याला कोण मारी यावर माझा विश्वास होता असे पुणे येथील बिबवेवाडीतील एका ३२ वर्षीय चित्रपट निर्देशक दिक्षेस शहा यांची सर्व आजारातून मुक्तता झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर व त्यांच्या आई - वडील, मित्रमंडळीच्या तसेच नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आज वय ३२ वर्षांचे झाले त्याचा मला खूप अभिमान वाटत आहे,
माझ्या आजारांची सुरुवात ती अशी की, सुरुवातीला मधुमेहाचे निदान झाले त्यानंतर दोन्ही किडन्या (मूत्रपिंड)निकामी झाल्या आणि त्यानंतर यकृत पिंडाचे आजार चढले या सर्व आजारातून एक एक करत तीन वर्षापासून तर ३२ वर्षापर्यंत नशिबाची झगडत व सतत प्रयत्न करीत या सर्व आजारांना तोंड देऊन मी आज ठणठणीत झालो आहे. माझ्यावर काय बितले हे कोणाला न कळलेच बरे,
या आजाराला खरोखरच मी अक्षरशः कंटाळलो होतो पण त्याला इलाज नव्हता, सतत आई - वडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी आधार देऊन प्रयत्न करून मला वाचविले, माझ्या जीवनात हे एक मोठे संकट आले होते ते आता पार केले, अवयव निकामी झाल्याचे दुःख काय असते ते मी भोगलेय, वयाच्या तिसऱ्या वर्षी मधुमेहाचे निदान झाले होते त्यामुळे २४ व्या वर्षी दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाली, मूत्रपिंड व स्वादुपिंड (पॅनक्रिया) मिळेपर्यंत डायलिसिस करणे, रक्त तपासणी यासारखे त्रास सहन करून मी माझ्या शरीरावर तब्बल एकतीस हजार वेळा पेक्षा जास्त टोचल्या पण गेल्यावर्षी मला मे महिन्यात एका देवदुताने मेंदूत ब्रॅण्डेड झाल्यावर अवधान केले व मला मूत्रपिंड व स्वादुपिंड मिळाले तेव्हापासून माझा त्रास पूर्णपणे संपलाय हा अनुभव व्यक्त करताना बिबवेवाडीतील बत्तीस वर्षीय चित्रपट दिग्दर्शक दीक्षेष यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते, डॉक्टर वृषाली पाटील, डॉक्टर अतुल मुळे व त्यांच्या टीमने हे यशस्वी शस्त्रक्रिया करून दिली, माझ्यासोबत माझे संपूर्ण परिवार, मित्र-वर्ग, गुरु, डॉक्टर आणि सहकार्य करणाऱ्यांनी फार मोलीची साथ दिली, रोज माझी शारीरिक व मानसिक आरोग्य बघून सर्व निराश होते पण जेव्हा माझ्या सर्जरीनंतर जे घडले आहे त्यात सर्वजण आनंदात आहेत आणि खुश आहेत हे सर्व निराशा सहन केले माझ्यासारखे अनेक जण या यादीत अवयाची वाट बघून आहेत त्यासाठी अवयव दान करणे हे फार गरजेचे झाले आहे त्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो मेंदू मृत झाल्यानंतर व्यक्ती आठ प्रकारचे अवयव दान करू शकतो हेच अवयव पुढे एखाद्याला अवयव मिळाल्यास त्याचे संपूर्ण जीवनच बदलून टाकतात, हेच दीक्षेष शहा यांच्या अनुभवातून दिसून येते.
पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीकडे अजूनही पुण्यासह आठ जिल्ह्यांमधील हजारो रुग्णांनी वेगवेगळ्या अवयव मिळवण्यासाठी नोंदणी केलेली आहे, दरम्यान त्या सर्वांना अवयव मिळू शकतात परंतु अवयवादानाबाबत असलेले गैरसमज अंधश्रद्धा जागृतीचा अभाव आहे,
पुण्यातील डॉ वृषाली पाटील व त्यांच्या टीम यांनी मला केलेले उपकार मी कधीच विसरणार नाही ते जरी म्हणत असेल तरी मी उपकारच म्हणणार ते एक जेव्हा समान व्यक्ती आहे परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो की एवढे आजार आणि वाईट कोणावर देऊ नये हीच प्रार्थना देवाकडे करीत आहे, या तिन्ही आजारातून वाचणे अशक्य होते परंतु ते देवाच्या व वडील वीरेंद्र शहा - आई स्वाती यांच्या कृपेने शक्य झाले आणि आज मी जग पाहत आहे,माझे वय फक्त तीन वर्षाचे होते तेव्हापासून मला आजाराने घेरले होते. आणि वयाच्या ३२ व्या वर्षी या आजारातून मी मुक्त झालो, मी अहिल्यानगर (अहमदनगर) शहरातील रहिवासी होतो परंतु या आजाराच्या उपचारासाठी पुण्यातच रहात आहे अशी प्रतिक्रिया दिक्षेष शहा यांनी पत्रकार शेख निसार मास्टर यांच्याकडे व्यक्त केली.तथा त्यांनी आपल्या संकलनातू हा दिक्षेष शहा यांच्या जीवनावर टाकलेला दृष्टिक्षेप.
*संकलन
ज्येष्ठ पत्रकार
शेख निसार (मास्टर)
*लेख विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार जी.एम.शेख- अहमदनगर
*वृत्त प्रसिद्धी विभाग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111