shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

दिवाळी किल्ले बनवा स्पर्धेचा निकाल २२ डिसेंबर २०२४ रोजी होणार जाहीर


शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन)
 सामाजिक बातमी

लोणी काळभोर- ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजीत भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२४ राबविण्यात आली या स्पर्धेत एकूण २११ विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धेचा निकाल २२ डिसेंबर २०२४ रोजी स्थळ पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे होणार आहे.वेळ सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे .ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून लोणी काळभोर व कदम वाकवस्ती येथील गावातील सर्व उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच किल्ला बनवा स्पर्धेत जे सहभागी स्पर्धक आहेत त्यांना आकर्षक १ फुटाची ट्रॉफी व प्रमाणपत्र कार्यक्रमात उपस्थित राहिल्यास देण्यात येणार आहे. 

सर्व स्पर्धकास कळविण्यात येत आहे की सकाळी ९:३० वाजता आपल्या पालकांना सोबत घेऊन कार्यक्रमास उपस्थित राहावे.कार्यक्रमाची सुरवात   छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरतीने करण्यात येणार आहे. आरती झाल्यानंतर उपस्थित मान्यवर यांचे सत्कार करण्यात येणार आहे,सत्कार झाल्यानंतर ज्या उपस्थित स्पर्धकांना पावडे म्हणण्यास संधी देण्यात येणार आहे. त्या नंतर बक्षीस वितरण कार्यक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे.अशी माहीती ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी दिली.
close