shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच – शवविच्छेदन अहवालात उघड

संभाजीनगर:-
छत्रपती संभाजीनगर येथे वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सोमनाथ सूर्यवंशी यांचे शवविच्छेदन करण्यात आले. पोस्टमार्टम अहवालानुसार, त्यांचा मृत्यू पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

      मयत सोमनाथ सूर्यवंशी

सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदनाचा डाॅक्टरांनी दिलेला अहवाल.


आंबेडकरी आंदोलकांची उपस्थिती

शवविच्छेदनाच्या वेळी आंबेडकरी आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष जगन्नाथ फुलारे, रामदास सुरे, चव्हाण टी.एस., परशुराम पाथरूड, देवकर साहेब, कैलास शिराळे, शिंदे, साळुंखे साहेब, आणि मनोहर विटकर यांचीही उपस्थिती होती.

निषेध आंदोलन आणि पोलिसांची लाठीचार्ज

संविधानाची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ परभणी शहरात वडार समाज संघ आणि आंबेडकरी जनतेने शांततेत आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. अनेक निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, आणि त्यांना अटक करण्यात आली.

सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू

याच पार्श्वभूमीवर, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी (दि.15) पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला.

वडार समाज संघाची मागणी

महाराष्ट्र वडार समाज संघाने या प्रकरणातील दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेषतः पोलिस अधिकारी अशोक घोरबाड व संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी संघटनेची मागणी आहे.

close