घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी, जिल्हाधिकारी यांना निवेदन
नगर / प्रतिनिधी:
परभणी जिल्ह्यात घडलेल्या संविधान अवमान प्रकरणी निषेध नोंदवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अ.नगर जिल्हाधिकारी मा. सिद्धराम सालिमठ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे तथा चर्मकार संघर्ष समिती आणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदि उपस्थित होते.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, परभणी जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील चौकात संविधान प्रतिकृतीची माथेफिरूने अवहेलना केली होती, आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार संघर्ष समिती यांच्या वतीने अशा विकृत प्रकाराचा जाहीर निषेध करून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित चौकशी करण्यात यावी व यामागील खऱ्या सूत्रधाराला अटक करण्यात यावी.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्व समाज घटकांना समतेच्या माध्यमातून न्याय मिळत आहे परंतु काही घाणेरडे प्रवृत्तींना हे मान्य नाही अशा प्रवृत्ती आणि त्यांचे सूत्रधार यांच्यावर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे अन्यथा या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे, समवेत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, लक्ष्मण साळे मेजर, संतोष त्रिंबके, विशाल बेलपवार, विजय दळवी, विठ्ठल जयकर, सोमनाथ केदारे, चंद्रकांत नेटके, सुनील केदार, नंदकुमार गायकवाड, निलेश सुरसे, प्रशांत घाडगे, रामकिसन साळवे मेजर, सुभाष झरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस,
श्रीरामपूर - 9561174111