श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील कला, क्रीडा व कार्यानुभव या अंशकालीन शिक्षकांनी मान.आमदार हेमंत ओगले यांना निवेदन दिले. यावेळी श्रीरामपूर तालुका कला, क्रीडा, कार्यानुभव समितीचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी २०११-१२ पासून आज पर्यंत अंशकालीन निदेशकांना तटपुंज्या मानधनावर कार्य करत असल्याचे सांगितले. तसेच नगरपालिका ,महानगरपालिका, जिल्हा परिषद या शाळांवर या अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती असते व त्यांना सहावी सातवी आठवी शंभर पेक्षा जास्त पट असेल तरच नियुक्ती मिळते. तर अशी अट न राहता दोन किंवा तीन शाळा एकत्रित करून ज्या शिक्षकांचा पट कमी झाला आहे. त्यांना देखील नियुक्ती देण्यात यावी. सध्याच्या मानधनात जास्त वाढ करून लवरकच कायम संवर्ग तयार करावा. आदि मागण्या मांडल्या. यावर आमदार श्री. ओगले म्हणाले की, निश्चितच या मागण्या रास्त असून सरकार याची दखल निश्चित घेईल आणि आम्ही देखील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडू आणि राज्यातील अंशकालीनिदेशकांना न्याय मिळवून देऊ असे सांगितले. याप्रसंगी अंशकालीन शिक्षक सुयोग सस्कर यांनी देखील निदेशकांच्या व्यथा मांडल्या.
यावेळी महिला तालुकाध्यक्ष पवार मॅडम, तरकासे मॅडम, यास्मिन पठाण ,राजगुरू सर, मोहसीन सर आदी उपस्थित होते.
*वृत विशेष सहयोग
सुयोग सस्कर,श्रीरामपूर
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111