shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

तालुका विज्ञान प्रदर्शनात काचोळे विद्यालय प्रथम

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
रयत शिक्षण संस्थेचे श्रीरामपूर येथील डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयाच्या तन्मय संतोष जमदाडे इयत्ता दहावी याने बनवलेले वाहतूक नियंत्रण व सुरक्षा हे उपकरण न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान (ता.श्रीरामपूर)  येथे आयोजित तालुका विज्ञान व गणित प्रदर्शनात इयत्ता नववी ते बारावी विज्ञान गटात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.

      विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा विज्ञान विषयाची रुची वाढावी भविष्यात शास्त्रज्ञ तयार व्हावी या उद्देशाने भरवण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील शाळांनी सहभाग नोंदवला होता. तन्मय जमदाडे याने हल्ली होणारे रस्ते अपघात तसेच वाहनांची वाढती संख्या यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर संशोधन करून वाहतूक नियंत्रण व सुरक्षा हे उपक्रम बनवले असून सद्य परिस्थितीत त्याची आवश्यकता आहे. तालुकास्तरीय या विज्ञान प्रदर्शनात सिद्धी गोर्डे, वैष्णवी पाठक, श्रद्धा बनकर, तन्मय जमदाडे आदींनी सहभाग घेतला होता. तन्मयला हे उपकरण बनवण्यासाठी विज्ञान विषय शिक्षिका रीना जोशी, स्नेहा निंबाळकर, संतोष सोनवणे, प्रयोगशाळा सहाय्यक जेजुरकर मॅडम आदींनी मार्गदर्शन केले.
        तन्मयच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने,जनरल बॉडी सदस्य प्रकाश पाटील निकम यांनी तन्मयचे, सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे तसेच पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर यांचे अभिनंदन केले.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
close