shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शास्त्री दांपत्याने अन्नदान करून जोपासली समाजसेवेची परंपरा.

शास्त्री दांपत्याने अन्नदान करून जोपासली समाजसेवेची परंपरा.

पळसदळ
:- एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे संचालक डॉ. विजय शास्त्री आणि सचिव सौ. रूपा शास्त्री यांनी 15 डिसेंबर रोजी श्री साई गजानन संस्थान, एरंडोलच्या सौजन्याने, एरंडोल ते शेगाव पायी वारी दरम्यान भाविक भक्तांना अन्नदान केले. या उपक्रमाच्या माध्यमातून शास्त्री दांपत्याने वारीतील भक्तांना अन्नदान करून समाजसेवेची परंपरा पुढे नेली आहे.
शास्त्री दांपत्याने अन्नदान करून जोपासली समाजसेवेची परंपरा.

यंदा एरंडोल ते शेगाव वारीचे 35 वर्ष पूर्ण झाले. या वारीमध्ये दरवर्षी हजारो भक्त एरंडोलहून शेगावकडे प्रस्थान करतात, आणि वारीला मोठा उत्साह असतो. शास्त्री दांपत्याच्या अन्नदानाच्या उपक्रमाबद्दल वारीतील भाविक भक्तांनी कृतज्ञता व्यक्त केली.

शास्त्री दांपत्याने अन्नदान करून जोपासली समाजसेवेची परंपरा.

डॉ. विजय शास्त्री आणि सौ. रूपा शास्त्री हे दरवर्षी कोणत्यातरी वारीत अन्नदान करतात. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, कर्मचारी प्रशांत निळे, विवेक पाटील तसेच महाविद्यालयातील इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

close