*नवनियुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री लोकनेते नरहरी झिरवाळ साहेबांना ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन (सर्वांसाठी मानवअधिकार) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा*
मुंबई / प्रतिनिधी:
नवनियुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री लोकनेते नरहरी झिरवाळ यांची ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन (सर्वांसाठी मानव अधिकार) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या.
ह्यूमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानव अधिकार या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर मानवी मूल्यांचे जतन व्हावे व सर्वांना न्याय मिळावा या भावनेने प्रेरित होऊन काम करणारे संघटनेचे नाशिकचे ज्येष्ठ समाजसेवक व संस्थापक अध्यक्ष वसीम सय्यद (गुड्डू भाई) यांच्यामार्फत नेहमीच राज्यभर कामकाज चालते.
या संघटनेच्या कामासाठी नियमितच मंत्रालय असेल किंवा शासकीय विभाग असेल अशा ठिकाणी सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी कार्यकर्त्यांना खेटा घालाव्या लागतात. समाजातील सर्व स्तरातील गोरगरिबांना व पिळवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन नेहमीच कार्यरत असते.
ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशनच्या सत्यलढ्यास पाठबळ देण्याकामी मा.ना.नरहरी झिरवाळ यांचे वेळोवेळी मोठे सहकार्य लाभते आहे, रांजले- गांजले अन्यायग्रस्त उपेक्षित आणी दुर्लक्षीत यांच्या विविध समस्या अग्रक्रमाने सोडविण्यासाठी ते सदैव उपलब्ध असतात.
मुळातच साहेबांची ओळखच एक सर्वसामान्य घरातील व्यक्ती म्हणून राज्यभर सर्वांना सुपरिचित तर आहेच परंतु अशा कामांसाठी झिरवाळ साहेब हे नेहमीच धावून येताना दिसतात. अशा लोकमान्य नेत्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळात अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून निवड होणं ही गौरवशाली बाब असून त्यांचा यथोचित सत्कार करणं गरजेचंच आहे. म्हणूनच अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या टीमने ना. नरहरी झिरवाळ साहेबांची भेट घेत त्यांना संगमनेर मध्ये येण्याचे निमंत्रण देत त्यांचा छोटेखानी सत्कार देखील करण्यात आला.
झिरवाळ साहेबांनी देखील संगमनेरच्या टीम कडे येण्याचे त्यांना आश्वासन दिले व लवकरात लवकरच आपल्यासाठी माझा वेळ राखीव ठेवून मी आपली सर्वांची भेट घेईल असे देखील इतक्या गडबडीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी ह्युमन इनोवेशन चे पदाधिकारी. अहिल्यानगर (अहमदनगर) महिला जिल्हाध्यक्षा बानोबी शेख, संगमनेर तालुकाध्यक्षा सविता भालेराव, संगमनेर शहर अध्यक्षा आरती सोनवणे, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हाध्यक्ष शौकत पठाण, जमीर शेख, सामाजिक कार्यकर्ते पंकज भाऊ पडवळ, तथा नाशिक जिल्ह्यातील महिला व पुरुष पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
खरंतर सर्वसामान्य कार्यकर्त्याचा त्याच्या नेत्याने केलेला गौरव ही फारच मोठी बाब असते,ना. नरहरी झिरवाळ यांच्या या निवडीने सर्व कार्यकर्त्यांना काम करताना आणखी मोठा आनंद प्राप्त झाला असल्याच्या भावनाही याप्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. तथा याप्रसंगी काही कार्यकर्ते आनंदाने खुपच भावूक झाले असल्याने काहींना गहिवरून आल्याचे दिसून आले.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111