शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शैक्षणिक बातमी
पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर यांच्या हस्ते नटराजाची पूजा करून करण्यात आले. प्रसंगी उपमुख्याधपक श्री. सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, संस्कृती समिती प्रमुख श्री. धनंजय काळे आणि श्री. योगेश कोठावदे आणि सदस्य उपस्थित होते.
दुसऱ्या दिवसाच्या पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शन समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे होत्या. कार्यक्रमासाठी कार्यवाह डॉ. सतीश गवळी सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके, शाला समिती अध्यक्ष व नियामक मंडळ सदस्य श्री. भगवानभाऊ आंबेकर, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाजसेवक श्री. नंदकुमार वाळंज, श्रीमती वत्सलाताई वाळंज, नियामक मंडळ सदस्य अॅड. संदीप अगरवाल, शाळा समिती सदस्य श्री. धीरूभाई कल्याणजी, श्री. राजेशजी मेहता, श्रीमती विशाखा भुरके, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, श्री. भरत हरपुडे (मा. नगरसेवक), श्रीमती कांचन लूनावत (मा. नगरसेविका), श्री. दत्तात्रय परदेशी (उपाध्यक्ष शिक्षक-पालक संघ) उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री. संजय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट आणि गाईड बँड पथकाद्वारे करण्यात आले. मागील शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक आणि विविध पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.
मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे व अध्यक्षा यांनी आपली मनोगते सादर केली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भरपूर शिक्षण घ्यावे आणि उद्योजक व्हावे असे आवाहन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देशाचा आधारस्तंभ बनावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पु. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विविध गुणदर्शन, विद्यार्थी पारितोषिक वितरण आणि शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. नृत्य, नाटक, पखवाज वादन, तबला वादन, पोवाडा गायन आणि संबळ वादन अशा विविध कला विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
अध्यक्षीय मनोगता मधून डॉ. मृणालिनी गरवारे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळ, सामाजिक कार्य आणि आई-वडिलांची व देशाची सेवा करण्याचे आवाहन केले. डॉ. सतीश गवळी, श्री. भगवानभाऊ आंबेकर आणि अॅड. संदिप अगरवाल यांनी देखील आपली मनोगते सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. सोमनाथ ढुमणे, कु. तनिष्का गायकवाड, चि. कौस्तुभ पवार यांनी केले. स्वागत गीत आणि ईशस्तवन चि. गौरव गोणते याने सादर केले. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांच्या यादीचे वाचन श्री. मुकुंद शिंदे, श्री. विठ्ठल खेडकर, श्रीमती गायत्री जामखिंडीकर यांनी केले. उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्काऊट आणि गाईडचे स्वयंसेवक, शिक्षक, सेवक यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याचबरोबर सांस्कृतिक समिती, पारितोषिक समिती, स्वागत समिती, स्टेज सुशोभन समिती आणि बैठक समिती यांनी आपापली कामे चोखपणे पार पाडून मोलाचे सहकार्य केले.