श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा तसेच विविध कार्यक्रम संपन्न झाले, मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी भाजीपाला तसेच खाऊचे पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले होते,
येथील शाळेच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना शालेय अध्ययनाबरोबर भौतिक आध्यात्मिक सामाजिक आर्थिक अशा विविध क्षेत्राचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी शाळेच्या माध्यमातून सतत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असते यामध्ये सांस्कृतिक, संगीत, कला, क्रीडा अशा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे कार्य शिक्षक वृंद करत आहेत.
यावेळी परिसरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण तसेच बाल आनंद मेळावा आदी कार्यक्रम संपन्न झाले.
शाळेचे उपमुख्याध्यापक संजय भरपुरे यांनी विशेष परीश्रम घेत विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा विकास होण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक विश्वास जगन्नाथ एकनाथ सर उप मुख्याध्यापक संजय भरपूरे सर, श्रीमती सय्यद नसरुद्दीन, श्रीमती तुरे सुनीता, श्रीमती लोहकरे अनुराधा, श्रीमती उबाळे सुरेखा आदी शिक्षक वृंद कार्यक्रमासाठी प्रयत्नशील होते.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक मोठ्या संस्थेने उपस्थित होते, मुख्याध्यापक विश्वास जगन्नाथ यांनी सर्वांचे आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*वृत्त प्रसिद्ध सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111