श्रीरामपूर / प्रतिनिधी:
परमपूज्य काका महाराज संस्थापक असलेल्या शहरातील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे चेअरमन अनिरुद्ध महाले यांच्या संकल्पनेतून ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहक दिनानिमित्त संस्थेत व्यवहारासाठी आलेल्या सर्व ग्राहकांचा गुलाब पुष्प व गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी लिखित ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य श्रीराम कुंभार, ऍड. व्ही. एन. ताके पाटील, लेखा परिक्षक डी.बी.मोरगे, प्रा.विश्वनाथ उंदरे, सुधीर गायकवाड, विमा सल्लागार गणेश कुसळकर, जालींदर विटेकर, सचिन मलिक, सपना मोकळ, योगेश राऊत,सचिन तेलोरे, विनोद डुंगरवाल, विनोद काला,अशोक विटेकर,अक्षय पवार,जितेंद्र कसार, रूपाली दळवी, निखिल खंडागळे, ज्ञानेश्वर नागरे, सुरेश पाटील उपस्थित होते.
ग्राहक दिन यशस्वीतेसाठी व्हा. चेअरमन दादासाहेब राऊत, संचालक कल्पेश चोथाणी, संदीप पटारे, डॉ. प्रशांत लखोटिया, बी. एन. पवार, बापूसाहेब गायकवाड, नंदकुमार धनवटे, सौ.शोभा कसार, संपत पुकळे, मॅनेजर गिरीजा टंकसाळे, दीपक दवंगे, भाऊसाहेब लगे ,निर्मला येवले, सचिन मुठे, अभिषेक कुसळकर, गिरीश टंकसाळे सुनील राजुळे, नाना काळे यांनी परिश्रम घेतले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111