अजीजभाई शेख / राहाता
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत आयोजित उत्तर विभागीय वकृत्व स्पर्धेत तनुजा भालेराव हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
अहिल्यानगर येथे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालयाच्या वतीने कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत आयोजित इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी या गटामध्ये तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. तनुजा भालेराव हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेसाठी नगर, बीड व नाशिक या जिल्ह्यातून शंभर पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा संपताच विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, गुणवत्ता कक्ष प्रमुख काकासाहेब वाळुंजकर, योगेश उगले आणि परीक्षकांच्या हस्ते तनुजा भालेराव व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती आंबेकर यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेसाठी सचिन झगडे, संजय बर्डे, व बी. एन. माळशिखरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
तिच्या या यशाबद्दल रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे, प्र. प्राचार्य संजय ठाकरे, प्र. मुख्याध्यापक सुभाष भुसाळ, प्र. पर्यवेक्षक अनिल जाधव, उपप्राचार्य अलका आहेर, विभाग प्रमुख डॉ. शरद दुधाट, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिला मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती आंबेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट - श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111