एरंडोल :-जळगाव जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार, तहसील कार्यालय एरंडोलच्या दोन पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली.
मौजे दापोरी शिवार 25 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. वाळू काढण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी केनी आणि तारही जप्त करण्यात आली.मौजे हणमंतखेडे सीम 15 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला.
कारवाई करणारे पथक तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कारवाईसाठी पुढील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.निवासी नायब तहसीलदार संजय घुले मंडळ अधिकारी उदय निंबाळकर,मनोज शिंपी, दीपक ठोंबरे ग्राम महसूल अधिकारी बालाजी लोंढे, वैभव पठे, रोहित इंगळे, नितीन पाटील, अमर भिंगारे, मयूर कुलकर्णी, रविराज पाटील, श्रीकांत कासुंदे, पार्थ यादव, मनोज सोनवणे, सागर कोळी, संदीप पाटील, वीरेंद्र पालवे, राहुल अहिरे, प्रशांत निकम, सुधीर मोरे, सुदर्शन पवार महसूल सेवक अमोल पाटील, प्रदीप पाटील, भूषण म्हस्के, मधुकर पाटील पोलीस पाटील उत्राण तिवारी, रवंजे बु खर्ची, राजेंद्र पाटील.
तहसील कार्यालयाच्या या धडक कारवाईने अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर चाप बसवण्याचा प्रयत्न केला आहे. महसूल आणि पोलिस विभागाच्या संयुक्त प्रयत्नामुळे ही मोहीम यशस्वी झाली. पुढील कारवाईसाठी दोषींवर कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे.