shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे मुस्ताक आयुब शेख यांच्यावर वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल..!

दिनांक 26/11/2024 रोजी शाखा अभियंता संदीप बराट यांनी वीजचोरी मोहीम राबविताना मौजे निमगाव वाघा येथे मुस्ताक आयुब शेख यांच्या घरची वीज जोडणी तपासली असता त्यांनी घराच्या बाजूला असलेल्या एल टी पोलवर फेज व नुट्रल ला आकडा टाकून अनाधिकृत वीज पुरवठा घेतलेले आढळून आले त्यांना 486  युनिटचे 9670 व कलम 152 प्रमाणे तडजोड रक्कम 2000 असे एकूण 11670 इतक्या रकमेचे वीज चोरीचे बिल दिले होते परंतु त्यांनी वेळेत बिल न भरल्यामुळे त्यांच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 880 भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास  ए पी आय प्रल्हाद गीते करत आहे. 




close