पाथर्डी प्रतिनिधी / वजीर शेख
आज देशातील अराजकता, हिंसा, सामाजिक व राजकीय परिस्थिती, भेदभाव,असहिष्णुता पाहता देशाला खरोखरच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज आहे असे उद्गार शिवशंकर
राजळे यांनी अध्यक्षपदावरून बोलताना काढले, कोळसांगवी (ता. पाथर्डी) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५ व्या व पद्मविभूषण स्व. निर्मला देशपांडे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते, यावेळी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष नासीर शेख व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोरगांवकर यांनी महात्मा गांधी व स्व. निर्मला देशपांडे यांच्या जिवन कार्याबद्दल माहिती दिली.
यावेळी चित्रकला स्पर्धेत व वक्तृत्व स्पर्धेत विजयी व सहभागी विद्यार्थींना रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले,यावेळी अर्जुन देशमुख,बद्रिनाथ काकडे, प्रकाश औसरमल, सुनिल शिंदे,अरविंद सोनटक्के, बशीर शेख, दगडू धनवडे, गणेश धनवडे,शरद घुले, वैभव घुले, रविंद्र गाडे, दिलीप सोळसे, कराड मॅडम, गावातील ग्रामस्थ,शाळेतील विद्यार्थी व पालकवर्ग आदि. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवराज फुंदे यांनी तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी आणी आभार प्रदर्शन अमोल फुंदे यांनी केले.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बातम्या आणी जाहिरातींसाठी
*संपर्क: 9561174111*