श्रीरामपूर / प्रतिनिधी:
हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व डॉ. बा. ग. कल्याणकर रात्रप्रशाला वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हेमंत तात्या ओगले , प्रमुख अतिथी डॉ. वंदनाताई मुरकुटे माजी सभापती श्रीरामपूर पंचायत समिती, संदिप चव्हाण अध्यक्ष इंजि.आर्किटेक्ट असोशिएयन,ॲड भागचंद चुडीवाल,जेष्ठ विधीज्ञ , बिहाणी माजी नगराध्यक्ष, रमेश कोठारी ज्येष्ठ पत्रकार, अजितशेठ नगरकर प्रतियश व्यापारी, शशांक रासकर माजी नगरसेवक, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, विशाल पोफळे माजी अध्यक्ष मर्चंट असोशियन, महंता यादव, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष प्रेमचंद कर्नावट, प्रतियश व्यापारी, विजय सेवक, प्रतियश व्यापारी सेवक प्रतिनिधी कल्याण लकडे, यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी रांगोळी, विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनकार नाटिका, पर्यावरण, देशभक्तीपर गीते, नृत्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले . वर्षभरात क्रीडा, व शैक्षाणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
या समारंभात विद्यालयाचे चेअरमन संजय छल्लारे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व कौतुक केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात हिंद सेवा मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक हॉल चे काम पुर्ण करण्याचे जाहिर केले मराठी माध्यमाला प्राधान्य दिले पाहिजे प्रत्येकाला इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे असे नमुद केले.
या कार्यक्रमाला अशोक थोरे मामा ज्येष्ठ शिवसेना नेते, ज्यू. कॉलेजचे चेअरमन विजय नगरकर , रात्र प्रशालेचे चेअरमन चंद्रकांत सगम, शां . ज . पाटणी विद्यालयाचे चेअरमन भरतशेठ कुंकूलोळ, शालेय समिती सदस्य नंदलाल कोठारी, किशोर गदिया , शैलजा चौधरी, नुतन बोरावके ,सुरेश कर्नावट , सुधिर वायखिडे ,विवेक गिरमे तसेच बाळासाहेब खाबिया, श्रीधर कोलते, किशोर फुणगे, माणिक जाधव, अरुण धर्माधिकारी, निलेश नागले, तेजस बोरावके ,डॉ. प्रकाश मेहेरकर, आशिष कर्नावट सिद्धांत छल्लारे , माजी शिक्षक अशोक शिंपी, माजी पर्यवेक्षिका विजया तागड, मधुकर क्षिरसागर, अंकुश सोनवणे, श्रीम लोळगे, हरीभाऊ डावरे स्नेह संमेलन प्रतिनिधी, शिक्षण प्रेमी नागरीक पालक सर्व शिक्षक व शिक्षकेतर प्रतिनिधी उपस्थित होते.
वंदे मातरम् ने स्नेहसंमेलनाची सांगता झाली.
*वृत्त विशेष सहयोग
अशोक खैरे (सर) , श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111