श्रीरामपूर :-
श्रीरामपूर शहराजवळील वडाळामहादेव परिसरातील एका कॅालेजात शिक्षण घेत असलेल्या एका २१ वर्षे वयाच्या तरुण विद्यार्थीनीचा वर्ग शिक्षक नेच विनयभंग केल्याने विद्यार्थीनी व पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी काल बाहेरच्या जिल्हयातील पिडीत विद्यार्थीनीने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी क्लास टिचर स्वप्नील रंभाजी भोसले, रा- कोल्हार ता. राहाता याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा भा. न्या. सं. कलम ७४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पिडीत विद्यार्थीनीने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी क्लास टिचर स्वप्नील भोसले याने मुलीच्या शरीरावर हात फिरून,लगट करून,तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला.हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहराजवळील वडाळामहादेव परिसरातील एका कॅालेजात घडला आहे.
या प्रकरणी पोनि देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सोळंके हे पुढील तपास करीत आहे.बाहेर गावच्या विद्यार्थिनी कशा संकटाला तोंड देतात! त्याच्या सुरक्षीततेचे काय ? असे प्रश्न जागरुक नागरिकांनी उपस्थित केले आहे.