*उपशीर्षक-प्राईड प्री स्कूल ,टाकळीभान येथे आजी- आजोबा मेळावा उत्साहात संपन्न
श्रीरामपूर/ प्रतिनिधी:
टाकळीभान - प्राईड अकॅडमी येथे आजी- आजोबा मेळाव्यासारखे उपक्रम घेऊन संस्कारक्षम पिढी घडविण्याचे उत्कृष्ट काम केले जाते असे प्रतिपादन टाकळीभान प्री स्कूल मध्ये आजी आजोबा मेळाव्या प्रसंगी माजी सरपंच भाऊसाहेब मगर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विवेक तुपे होते.
याप्रसंगी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे, मा. सभापती व प्राईड अकॅडमीच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे,राजेंद्र कोकणे, सुनील रणनवरे, बाळासाहेब बेरड, अण्णा शेळके ,बाबू तागड, घुमनदेवचे सरपंच श्रीपाद गायकवाड, बाळासाहेब कांगुणे आदी पउपस्थित होते.
यावेळी मगर बोलताना म्हणाली की आजोबा व घरातील नातवांचं अनोखे नाते असते, नातवाचे लाड,हट्ट आजोबा लाडाने पुरत असतात. या कार्यक्रमाद्वारे शाळेतील आपल्या नातवांचे कौतुक आजोबांना पाहायला मिळते. नातवांनाही यामध्ये आनंद मिळतो. व येथील शिक्षण पद्धती पाहून निश्चितच या शाळेची विद्यार्थी संख्या भविष्यामध्ये मोठ्या संख्येने वाढून प्राईड अकॅडमीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू राहील. यावेळी डॉ. वंदनाताई मुरकुटे म्हणाले की पाच वर्षाच्या आत मुलांच्या मेंदूचा विकास होत असल्याने यावेळी त्यांना योग्य समजेल अशा सोप्या पद्धतीचे शिक्षण व संस्कार होणे महत्त्वाचे असते. भक्कम पायावरच पुढील देशाचे सुजाण नागरिक तयार होतात. व चांगले नागरिक घडवण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राईड अकॅडमी मध्ये फोनिक्स द्वारे व डिजिटल द्वारे अत्याधुनिक शिक्षण पद्धतीनचे शिक्षण दिले जाते. सर्वांचे प्रेम व सहकार्यामुळे प्राइड अकॅडमीची घोडदोड यशस्वी सुरू असून आपल्या सर्वांचे यास आशीर्वाद आहेत असे त्या म्हणाल्या. यावेळी बाळासाहेब कांगुने, सुनील रणनवरे यांनीही प्राईड अकॅडमी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रारंभी प्राईड अकॅडमी शाळेच्या प्रगती विषयी शिक्षिका जयश्री वाडेकर यांनी माहिती दिली. यावेळी आजी-आजोबांनी आपल्या पाल्यांचे कौतुक करून येथील शाळेमुळे त्यांच्यामध्ये अमुलाग्र बदल झाल्याचे मनोगतात सांगितले. काही पालक आजोबांना आपल्या नातवांचे कौतुक करताना व प्रगती विषयी सांगताना अश्रू अनावर झाले.या कार्यक्रम प्रसंगी श्रीधर गाडे, बंडू बोडखे ,अर्जुन राऊत, रावसाहेब वाघुले, अशोक शिंदे, आप्पासाहेब वाघुले, अंबादास तुपे ,उत्तम पवार, पंढरीनाथ बिरदवडे, केतन शिंदे,ज्ञानेश्वर वखरे, राजेंद्र परदेशी, प्रभाकर बारस्कर , भागवत दवंगे आदींसह पालक आजी -आजोबा विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन आदिती जंगम यांनी तर आभार ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदीप गोराणे ,सुप्रिया कोकणे, निकिता शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111