" तो सुर्यवंशी आहे, तो दररोज सकाळी उगवणारच्. तो सुर्यवंशी आहे, तो त्याच्या किरणांनी आसमंत उजळून काढणारच्. तो सुर्यवंशी आहे, तो उजळ माथ्याने पुन्हा समाजात वावरणारच्. तो सुर्यवंशी आहे, तो संविधानातील मानवीय मूल्यांच्या रक्षणासाठी उठणारच्. तो सुर्यवंशी आहे, तो मानवांच्या सर्वांगीण कल्याणासाठी हजारदा मरून सुद्धा पुन्हा जिवंत होणारच् आणि येथील जात्यांध, धर्मांध मनुवाद्यांच्या छाताडावर पाय रोवणारच्. कारण तो सुर्यवंशी संविधानाला अभिप्रेत एक भारतीय नागरिक आहे. तो सुर्यवंशी हिंदू नव्हता, तो मुसलमान नव्हता, तो बौद्ध नव्हता. वडार समाजाचा भीमसैनिक होता. तो होता एक सच्चा भारतीय नागरिक, एक सच्चा संविधान रक्षक."
लातूर येथील रहिवासी सोमनाथ सुर्यवंशी. परभणीच्या शिवाजी लाॅ काॅलेजचा तिसऱ्या वर्षांतील हुषार विद्यार्थी. परभणीत तो किरायाने राहत होता. घरची गरीबी म्हणून आई, वडील, भाऊ असे सगळेजण पुण्यात राहून काबाडकष्ट करायचे. त्यातच सोमनाथच्या वडीलाचे निधन झालेले. सोमनाथ शिक्षणासाठी परभणीत आला. खुप शिकून मोठा वकील बनून गोरगरीबांना न्याय देऊ, हे स्वप्न तो उराशी बाळगून होता. पण संविधानाविषयी मनात आणि मेंदूत आकस ठेवून असलेल्या जात्यांध पोलीस विकृत मानसिकतेने, या उमद्या तरूणाचा खुन केला. परभणीत 10 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. ही विटंबना करण्यासाठी जाणीवपूर्वक "पवार" या हिंदू नावाच्या धर्मांध माथेफीरूला, मनुवाद्यांनी फूस लावून आणि घटनास्थळी पाठवून त्याच्याकडून हे कृत्य करवून घेतले, असे आज सर्वत्र बोलल्या जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ 11 डिसेंबर रोजी परभणी शहर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शहर बंदची हाक दिली. या बंद मधे संपूर्ण शहरवासीय सहभागी झाले. पण काही जात्यांध आणि धर्मांध, संविधान विरोधी, मनुवादी माथेफिरूंना हा उस्फूर्त आणि शांततेतील बंद सहन झाला नाही, आणि त्यांनी या बंद मधे जातीयवादी गुंडांना आणि समाजद्रोह्यांना घुसवून शहरात विध्वंस घडवून आणला. परभणी पोलीसांनी खरे गुन्हेगार शोधून पकडण्या ऐवजी शांततेच्या मार्गाने बंद पाळणाऱ्या शेकडो निष्पाप विद्यार्थी, युवक, महिला, नागरीक, कार्यकर्त्यांना पकडून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. 12 डिसेंबर रोजी विधी महाविद्यालयीन विद्यार्थी सोमनाथ सुर्यवंशी याला परभणीच्या नवा मोंढा पोलीस निरीक्षकाने त्याचा बोलविता धनीच्या सांगण्यावरून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, त्यास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 14 रोजी पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पुढील न्यायालयीन कोठडी सुनावली, म्हणून सोमनाथची कारागृहात रवानगी झाली. आणि रविवारी 15 डिसेंबर रोजी पहाटे त्याची प्रकृती खालावली म्हणून पोलीसांनी त्याला परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सोमनाथचा मृत्यू हा न्यायालयीन कोठडीत होतो, तो हाॅस्पीटल मधे होत नाही, हे महाभयंकर आहे. या घटनेमागे निश्चितच 1) संविधान विरोधी, मनुवादी माथेफिरू आहेत, जे संविधानिक जनचळवळीला बदनाम करू पहात आहेत. 2) ही घटना म्हणजे संविधान विरोधी, जात्यांध आणि धर्मांध विकृतांनी ठरवून केलेली कृती आहे. 4) संविधानिक चळवळ बदनाम करण्यासाठीच् रचलेले हे एक षडयंत्र आहे. यात समाजकंटकांना आणि जात्यांध गुंडांना घुसवून घडवून आणलेली ही घटना आहे. 4) या घटनेमागे एक गर्भीत इशारा आहे, आणि तो म्हणजे "आता मी पुन्हा आलो आहे." आणि संविधानाचा डंका पिटणार्यांची आता गय केली जाणार नाही. म्हणून ही घटना म्हणजे संविधान मानणाऱ्यांसाठी एक गर्भीत इशाराच आहे. 5) राज्यात संविधानाची शपथ घेण्याच्या काळात हा प्रकार घडवून आणला गेला आहे, ते हे दाखवण्यासाठी की, आम्ही संविधानाला जुमानत नाहीत. परंतू अशा मनुवादी विकृतांना आम्ही पण हे सांगू इच्छितो की, राज्यातील जनता तुमच्या अशा विषम आणि विकृत मनुस्मृतीपुरक मनसुब्यांना उधळून लावल्याशिवाय शांत बसणार नाही. येथील जनता तुम्हाला मानवद्रोही मनुस्मृतितील जाचक नियमांनुसार राज्य हाकू देणार नाही. 1) परभणी शहराचा जिल्हाधिकारी याला तात्काळ बडतर्फ करून अटक करा. 2) पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक याना ही बडतर्फ करून अटक करा. कारण शहरात आणि जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात, शांतता प्रस्थापित करण्यास, सामाजिक सौहार्द अबाधित ठेवण्यास यांनी जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केला आहे. 3) सोमनाथच्या पोस्टमार्टेम अहवालात "डेथ ड्यू टू फाॅलोईंग मल्टीपल इन्जूरीज्" असे न लिहीता "शाॅक फाॅलोईंग मल्टीपल इन्जूरीज्" असे लिहीणाऱ्या डाॅक्टरांच्या विरोधात सुद्धा गुन्हे नोंदवून त्यांना तात्काळ अटक करा. 4) कारागृह अधीक्षकाला आणि नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला तात्काळ अटक करा. 5) या संपूर्ण घटनेची निवृत्त न्यायाधीशां मार्फत सखोल चौकशी करून त्या अहवालाचे राज्यभरातील शहरांच्या चौकाचौकात वाचन करा. 6) शासकीय, प्रशासकीय, जात्यांध, धर्मांध, मनुवादी गाव गुंडांवर खुनाचे आणि देशद्रोह्याचे गुन्हे नोंदवून त्यांना जेरबंद करा. 7) शहिद सोमनाथ सुर्यवंशी याच्या आई विजयाबाई आणि भावास एक कोटी रू. नुकसान भरपाई देऊन त्यांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे. 8) 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी उरकल्यानंतर 15 डिसेंबर रोजी मंत्रीमंडळ शपथविधीदिनी न्यायालयीन कोठडीत याच दिवशी सोमनाथचा मृत्यू होणे, म्हणजे पूर्वीची "भग देणे" हि अमानवीय आणि कू प्रथा पुन्हा एकदा राज्यात प्रभावीपणे राबविण्याचे हे संकेत तर या सरकारने प्रशासना करवी दिले नाहीत ना? या दिशेने ही सखोल तपास व्हायला हवा. कारण 2014 मधे सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मेनन याला फासावर लटकवण्यात येऊन मुसलमानांना एक प्रकारे गंभीर इशारा देण्यात आला होता. 9) परभणीचे खासदार आणि आमदार यांनी आपल्या जिल्हयात घडलेल्या सदर घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून आपापल्या पदाचे राजीनामे द्यावेत. या मागण्यांसह राज्यातील माझ्या तमाम नागरिक बंधू भगिनींनो,1) संविधानातील मानवीय मूल्यांच्या अंमलबजावणी साठी एक व्हा. 2) संविधानिक चळवळ अधिक गतिमान करून ती सर्वदूर पोहचवण्यासाठी भारतीय नागरिक म्हणून संघटीत व्हा. 3) राज्यात विकृत आणि विषम मनुस्मृतीच्या विचार - कृतीला उत्तर म्हणून समाजात एकोपा, शांतता, समानता, एकता, भाईचारा, सद्भभावना, बंधुभाव, न्याय, जातीय - धर्मीय सलोखा, सामाजिक सौहार्द फुलविण्यासाठी शांततामय संघर्षास सज्ज व्हा. 4) राज्यात विकृत आणि विषम मनुस्मृती राबविण्याचे सरकारचे क्रूर मनसुबे उधळून लावण्यास सज्ज व्हा.
लढेंगे जितेंगे.
जगन्नाथ फुलारे प्रदेशाध्यक्ष वडार समाज संघ
छत्रपती संभाजीनगर
(औरंगाबाद)
मो. 8999865845