shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

तब्बल १७ वर्षांनंतर भेटले जिवलग मित्र

धरणगाव – येथील बालकवी ठोंबरे विद्यालयातील १० वी (२००५) आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील १२ वी (२००७) पूर्ण केल्यानंतर शिक्षणासाठी विविध ठिकाणी गेलेले जिवलग मित्र आज तब्बल १७ वर्षांनी एकत्र आले. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून या मित्रांनी नंतर नोकरीसाठी विविध ठिकाणी स्थिरावले होते. मात्र, मैत्रीचे नाते हे अगदी वेगळे असते. पुणे, मुंबई, गांधीनगर, अहमदाबाद, धरणगाव इ. ठिकाणी असलेले हे मित्र एकत्र येण्यासाठी कर्जत रेल्वे स्टेशनपासून १५ किमी अंतरावर असलेल्या "मधुबन" फार्म हाऊसवर गेट टुगेदरसाठी जमले.

तब्बल १७ वर्षांनंतर भेटले जिवलग मित्र
या गेट टुगेदरमध्ये डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शिक्षक, प्रायव्हेट जॉब करणारे तसेच बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेले मित्र एकत्र आले. या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मित्रांनी धावपळीच्या जीवनातून वेळ काढून या गेट टुगेदरमध्ये भाग घेतला. एक गोष्ट विशेष होती, की शाळेतील शांत मुलं आज खूप बोलत होती, आणि ज्या मुलांना शाळेत भरपूर बोलायचं असं वाटायचं, त्या आज शांत होत्या. 
तब्बल १७ वर्षांनंतर भेटले जिवलग मित्र

मधुबन फार्म हाऊसला आल्यानंतर सर्व मित्र फ्रेश झाले. त्यानंतर स्विमिंग आणि विविध खेळांचा आनंद घेत गप्पा मारताना, जुन्या आठवणींना उजाळा दिला. 'राज सबिके होते हैं, किसिके छिप जाते हैं तो किसिके छप जाते हैं' या उक्तीसारख्या गप्पा मारताना त्यांना एक दुसऱ्याशी संबंध जोडण्याचा आनंद होता. रात्री उशिरापर्यंत गप्पा केल्यानंतर सकाळी फ्रेश होऊन चहा-नाश्ता केला आणि पुन्हा एकमेकांबद्दलची आवड व्यक्त केली. 

ही भेट इतकी जिव्हाळ्याची होती की, एकमेकांना निरोप देताना प्रत्येकाने त्याच्या मोबाईलमध्ये या आठवणींचे फोटो टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मित्र कसा का असेना, तो असला पाहिजे, हे सर्व मित्रांनी मान्य केले. मित्राच्या साथीत आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते, आणि संकटांच्या वेळी तो आपल्याला आधार देतो, हे सत्य त्यांना पुन्हा एकदा जाणवलं.

हा अविस्मरणीय आणि विलोभनीय कार्यक्रम उमेश पाटील आणि मयूर भावसार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला हरिष लोहार, विशाल पितृभक्त, संदीप महाजन, त्रिदेव पाटील, अमोल वाघ, शुभम भावे, राहुल भावसार, भरत धरम, मोहित पवार, विवेक दाणेज, राज बिचवे, विशाल चौधरी, दिपक पाटील, गणेश माळी, पंकज पाटील, लक्ष्मण पाटील यांसारखे मित्र उपस्थित होते.

close